Join us

एकावेळी ५ चपात्या लाटण्याची ट्रिक! पाहा व्हायरल व्हिडिओ, चटकन लाटून होतील टोपलीभर चपात्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 12:31 IST

Viral Roti Making Hacks : अनेकांना गोल चपाती करताही येत नाही. अशात  ५ चपात्या एकत्र करणं म्हणजे चॅलेंन्जपेक्षा कमी नाही. एकावेळी जास्त चपात्या कशा लाटायच्या याचा व्हिडिओ पाहूया.

भारतीय घरांत स्वंयपाकाला 'पाक कला' असं म्हणलं  जातं. जेवण बनवताना डोकं आणि मन दोन्ही गोष्टींना विचार करावा लागतो. जर जेवण करताना तुमचं डोकं ठिकाणावर नसेल तर अनेकदा चव बिघडण्याची भिती असते. उत्तम स्वयंपाक करणं काही सोपं काम  नाही.  (Viral Roti Making Hacks) काही सोप्या किचन हॅक्सचा वापर केला तर तुमचं काम अधिकच सोपं होऊ शकते. सोशल मीडियावर असे बरेच व्हिडिओज व्हायरल होत असतात ज्याद्वारे किचनचं काम सोपं करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या सुचवल्या जातात. (How to Make More Chapatis in Less Time)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एकावेळी ५ चपात्या  लाटण्याचं चॅलेंन्ज दाखवण्यात आले आहे.  चपाती लाटणं ही सुद्धा एक कला आहे जी सर्वांनाच जमते असं नाही. अनेकांना गोल चपाती करताही येत नाही. अशात  ५ चपात्या एकत्र करणं म्हणजे चॅलेंन्जपेक्षा कमी नाही. एकावेळी जास्त चपात्या कशा लाटायच्या याचा व्हिडिओ पाहूया.

चपाती मऊ होण्यासाठी पीठ जास्त घट्ट मळू नका किंवा  मऊही मळू नका. पिठावर थोडं तेल लावा. एकावर एक  ४ ते ५ चपात्यांचे गोळे एकावर एक ठेवून लाटून घ्या. तुम्हाला  एकावेळी ५ चपात्या ठेवायच्या नसतील तर तुम्ही सुरूवातील ३ घेऊ शकता. या व्हायरल व्हिडिओमध्ये एकावेळी  ५ चपात्या लाटताना तुम्ही पाहू शकता. चपात्या एकमेकांना चिकटण्याही धोका असतो. ३  गोळे तयार करून ते रोल करून व्यवस्थित लाटा आणि प्रत्येक गोळ्याला व्यवस्थित पीठ  लावा. ज्यामुळे चपात्या एकमेकांना चिकटत नाहीत.

दाट-शायनी केसांसाठी माधुरी लावते केसांना हा पदार्थ; आठवड्यातून एकदा १ उपाय, सुंदर होतील केस

१) अनेकजण कोमट पाण्याचा वापर चपातीचं पीठ मळण्यासाठी करतात. ज्यामुळे पीठ मळणं अधिकच सोपं होतं. चांगल्या परिणामांसाठी थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. एकत्र पाणी घालून पीठ मळणं थोडं कठीण होऊ शकते. जसजसं पाणी घालाल पीठ एकजीव होत जाईल.

२) पीठ मळून झाल्यानंतर कॉटनच्या पातळ कापडाने झाकून ठेवा.  कारण पीठ जास्तवेळ उघड्यावर ठेवलं तर त्यातलं मॉईश्चर कमी होत जातं. पीठ मळून थोडावेळ झाल्यानंतर  तूप किंवा तेल लावून ५ मिनिटं तसंच ठेवा.

कोण म्हणतं फक्त दूधाने कॅल्शियम मिळतं; ५ पदार्थ खा, चारपट जास्त कॅल्शियम मिळेल-पोलादी होतील हाडं

३) जर तुम्ही पहिल्यांदाच चपाती करत असाल तर ती पूर्णपणे गोल असेलच असं नाही. आकार बिघडू सुद्धा शकतो. अशावेळी चपाती पूर्णपणे गोल असेल याची खात्री करा. एखाद्या डब्याच्या झाकणाने चपातीला गोल आकार द्या.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स