Lokmat Sakhi >Food > दम बिर्याणीसारखाच भन्नाट 'दम की चाय', भाजून काढणाऱ्या उन्हात ‘दम’चहाची व्हायरल चर्चा

दम बिर्याणीसारखाच भन्नाट 'दम की चाय', भाजून काढणाऱ्या उन्हात ‘दम’चहाची व्हायरल चर्चा

Hydrabadi 'Dum ki Chai' Recipe: हैद्राबादची खासियत असणारा 'दम की चाय' हा प्रकार सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चहाप्रेमींनी एकदा करून पाहावी, अशी खास रेसिपी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2024 04:22 PM2024-05-23T16:22:31+5:302024-05-23T17:01:32+5:30

Hydrabadi 'Dum ki Chai' Recipe: हैद्राबादची खासियत असणारा 'दम की चाय' हा प्रकार सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चहाप्रेमींनी एकदा करून पाहावी, अशी खास रेसिपी....

viral recipe of hydrabad's famous dum ki chai, how to make dum ki chai, hydrabadi dum ki chai recipe | दम बिर्याणीसारखाच भन्नाट 'दम की चाय', भाजून काढणाऱ्या उन्हात ‘दम’चहाची व्हायरल चर्चा

दम बिर्याणीसारखाच भन्नाट 'दम की चाय', भाजून काढणाऱ्या उन्हात ‘दम’चहाची व्हायरल चर्चा

Highlightsचहाप्रेमी असाल तर एकदा ही रेसिपी बघा आणि दम की चाय पिऊन पाहा. दम बिर्याणीप्रमाणेच ही रेसिपी मुळची हैद्राबादची आहे.

हैद्राबादचा प्रसिद्ध पदार्थ म्हणजे दम बिर्याणी... आता अतिशय चवदार बिर्याणी सगळीकडेच मिळते. पण तरीही बिर्याणी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती हैद्राबादी दम बिर्याणी. आता या दम बिर्याणीच्या जोडीनेच दम की चाय हा चहाचा प्रकार सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे (Hydrabadi 'dum ki chai' recipe). गंमत म्हणजे भर उन्हाळ्यातही हा चहा पिण्यासाठी अनेक उत्सूक आहेत.. चहाप्रेमी असाल तर एकदा ही रेसिपी बघा आणि दम की चाय पिऊन पाहा. दम बिर्याणीप्रमाणेच ही रेसिपी मुळची हैद्राबादची आहे. (viral recipe of Hydrabad's famous 'dum ki chai')

 

'दम की चाय' करण्याची रेसिपी

दम लावून बिर्याणी करणे म्हणजे अगदी कमी आचेवर अतिशय हळूवारपणे तांदूळ, भाज्या शिजवून घेणे. त्याला दम बिर्याणी म्हणतात. दम की चाय हा प्रकारही तसाच आहे. हा चहा करण्यासाठी दूध बराच वेळ मंद आचेवर उकळलं जातं.

ऐश्वर्या नारकर यांची स्पेशल मँगो कुल्फी रेसिपी, कुल्फीमुळे वजन वाढू नये म्हणून खास टिप्सही

असं म्हणतात की हैद्राबादमध्ये जे स्टॉल दम की चाय या चहाप्रकारासाठी प्रसिद्ध आहेत, तिथे तर पाण्यामध्ये साखर, चहापावडर, इतर मसाले असे सगळे जिन्नस घातले जातात आणि कित्येक तास ते पाणी मंद आचेवर उकळलं जातं. अगदी हळुवारपणे चहा उकळल्यामुळे चहाचा स्वाद, त्यातले मसाले पाण्यामध्ये खूप छान पद्धतीने मुरले जातात आणि त्याचा छान स्वाद लागतो.

 

अशा पद्धतीने दम लावून उकळण्यात आलेल्या चहामध्ये घट्ट आटवलेले दूध टाकले जाते आणि त्यातून जो चहा तयार होतो त्याला 'दम की चाय' असं म्हणतात. 

उन्हाळ्यात वाळ्याचं पाणी प्या, आहारतज्ज्ञ सांगतात ५ फायदे- उन्हाळ्यातील असह्य त्रासांवर पारंपरिक औषध

बासुंदीप्रमाणे तयार झालेलं घट्ट दूध आणि मंद आचेवर तासनतास उकळलेलं चहाचं पाणी या दोन गोष्टी दम की चाय ला एक वेगळाच स्वाद आणि रंग देतात. त्यामुळेच तर त्याची चव चहा प्रेमींच्या जिभेवर कित्येक दिवस रेंगाळत राहाते.


 

Web Title: viral recipe of hydrabad's famous dum ki chai, how to make dum ki chai, hydrabadi dum ki chai recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.