Lokmat Sakhi >Food > ऐश्वर्या नारकर सांगतात मँगो कुल्फी रेसिपी, आणि कुल्फीमुळे वजन वाढू नये म्हणून खास टिप्सही

ऐश्वर्या नारकर सांगतात मँगो कुल्फी रेसिपी, आणि कुल्फीमुळे वजन वाढू नये म्हणून खास टिप्सही

Mango Kulfi Recipe Shared By Actress Aishwarya Narkar: मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मँगो कुल्फी करण्याची एकदम सोपी रेसिपी सोशल मिडियावर शेअर केली आहे.. (simple and easy recipe of mango kulfi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2024 01:19 PM2024-05-23T13:19:31+5:302024-05-23T16:34:51+5:30

Mango Kulfi Recipe Shared By Actress Aishwarya Narkar: मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मँगो कुल्फी करण्याची एकदम सोपी रेसिपी सोशल मिडियावर शेअर केली आहे.. (simple and easy recipe of mango kulfi)

Mango kulfi recipe shared by actress aishwarya narkar, how to make mango kulfi, simple and easy recipe of mango kulfi | ऐश्वर्या नारकर सांगतात मँगो कुल्फी रेसिपी, आणि कुल्फीमुळे वजन वाढू नये म्हणून खास टिप्सही

ऐश्वर्या नारकर सांगतात मँगो कुल्फी रेसिपी, आणि कुल्फीमुळे वजन वाढू नये म्हणून खास टिप्सही

Highlightsतुम्हालाही कुल्फी, आंबा खाऊन वजन वाढण्याची भीती वाटत असेल तर त्यासाठी काय करावं?

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे कुल्फी, सरबतं, वेगवेगळे शेक, आईस्क्रिम असे थंडगार पदार्थ घरोघरी हौशीने तयार केले जातात. आपले काही हौशी सेलिब्रिटीही या बाबतीत अजिबात मागे नाहीत. त्यापैकीच एक आहेत ऐश्वर्या नारकर. त्या सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असतात. गार्डनिंग, व्यायाम, ब्यूटी याबाबत अनेक मजेशीर रिल्सही टाकतात. आता नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये त्यांनी मँगो कुल्फी घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने कशी तयार करायची, याची रेसिपी सांगितली आहे (how to make mango kulfi). फक्त एवढंच नाही तर कुल्फी खाऊन वजन वाढण्याची भीती वाटत असेल तर त्यासाठी काय करावं, हे देखील सांगितलं आहे. (Mango kulfi recipe shared by actress Aishwarya Narkar)

 

मँगो कुल्फी करण्याची रेसिपी

साहित्य 

२ ते ३ कप दूध

उन्हाळ्यात फुलझाडांची पानं सुकली- पिवळी पडून गळू लागली? २ सोपे उपाय- पानाफुलांना येईल बहर

१ कप कंडेन्स मिल्क

तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स

३ ते ४ आंबे

 

कृती

१. सगळ्यात आधी दूध एका भांड्यात टाका आणि गॅसवर गरम करायला ठेवून त्याला चांगलं उकळून घ्या.

२. या उकळत्या दुधामध्ये कंडेन्स मिल्क टाका आणि पुन्हा ते एकत्रितपणे काही मिनिटे गरम होऊ द्या.

शरीरातील व्हिटॅमिन D ची कमतरता दाखवून देणारी ५ लक्षणं- हा त्रास वेळीच ओळखा, नाहीतर....

३. दूध घट्ट झालं की त्यामध्ये सुकामेवा घाला आणि गॅस बंद करा. तुम्हाला जो आवडेल तो सुकामेवा किसून किंवा तुकडे करून तुम्ही टाकू शकता.

४. दूध पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर एक आंबा घ्या. आता आंबा न चिरता त्याच्या आतली कोय सुरीच्या मदतीने अलगद काढून टाका. आता त्या आंब्यामध्ये आपण तयार केलेले कंडेन्स मिल्क ओता आणि हे आंबे ६ ते ७ तासांसाठी फ्रिजरमध्ये ठेवून द्या.

५. जेव्हा कुल्फी खायची असेल तेव्हा आंबा फ्रिजमधून बाहेर काढा, त्याच्यावरचे साल काढून टाका आणि तो आंबा मधोमध चिरून मँगो कुल्फी सर्व्ह करा.  

 

कुल्फी खाऊन वजन वाढण्याची भीती वाटत असेल तर..

ऐश्वर्या नारकर यांच्या या व्हिडिओला बऱ्याच कमेंट आल्या आहेत. त्यापैकी एकीने त्यांना "Do you eat sweets that are with condensed milk ..my myth is busted right now.. " हा प्रश्न विचारला आहे.

ऐश्वर्या रायला ट्रोल करणाऱ्यांना लेक आराध्या बच्चनने दिलं खणखणीत उत्तर- बघा काय केलं...

ऐश्वर्या यांच्या फिटनेसकडे पाहून कोणालाही हा प्रश्न पडणं साहजिक आहे. यावर ऐश्वर्या यांनी "yyes yyesss.... exercise nullifies all" असं मजेशीर उत्तर दिलं आहे. त्यामुळे तुम्हालाही कुल्फी, आंबा खाऊन वजन वाढण्याची भीती वाटत असेल तर दुसऱ्या दिवशी आणखी जोमाने व्यायाम करा... मुळीच वजन वाढणार नाही. 

 

Web Title: Mango kulfi recipe shared by actress aishwarya narkar, how to make mango kulfi, simple and easy recipe of mango kulfi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.