Lokmat Sakhi >Social Viral > आराध्या बच्चनच्या शर्टवर दिसला खास मेसेज! ऐश्वर्या राय ट्रोल होत असताना लेकीनं पाहा काय सांगितले..

आराध्या बच्चनच्या शर्टवर दिसला खास मेसेज! ऐश्वर्या राय ट्रोल होत असताना लेकीनं पाहा काय सांगितले..

Aaradhya Bachchan's Stunning Action : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Aishwarya Rai and Abhishek Bachchan) यांची लेक आराध्या बच्चनने सध्या मिडियाचं लक्ष वेधून घेतलं आहे, बघा तिने नेमकं काय केलं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2024 12:05 PM2024-05-23T12:05:18+5:302024-05-23T16:38:46+5:30

Aaradhya Bachchan's Stunning Action : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Aishwarya Rai and Abhishek Bachchan) यांची लेक आराध्या बच्चनने सध्या मिडियाचं लक्ष वेधून घेतलं आहे, बघा तिने नेमकं काय केलं....

Aaradhya Bachchan's stunning action after mom aishwara rai get trolled in cannes festival | आराध्या बच्चनच्या शर्टवर दिसला खास मेसेज! ऐश्वर्या राय ट्रोल होत असताना लेकीनं पाहा काय सांगितले..

आराध्या बच्चनच्या शर्टवर दिसला खास मेसेज! ऐश्वर्या राय ट्रोल होत असताना लेकीनं पाहा काय सांगितले..

Highlightsसध्या ती खूप जास्त ट्रोल होत आहे. तिच्या ट्रोल होण्यामागचं कारण आहे ते कान्स महोत्सवात तिने केलेलं ड्रेसिंग.

आपल्याला माहितीच आहे की अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चत तिच्या लेकीसह म्हणजेच आराध्या बच्चन हिच्यासोबत कान्स महाेत्सवात गेली होती. ऐश्वर्याच्या हाताला त्यावेळी प्लास्टर घातलेलं दिसून आलं. हाताला दुखापत झालेली असतानाही ती कान्समध्ये गेली, यामुळे खरंतर तिच्या मेहनती स्वभावाचं तिचे चाहते कौतूकच करत आहेत. पण तरीही सध्या ती खूप जास्त ट्रोल होत आहे. तिच्या ट्रोल होण्यामागचं कारण आहे ते कान्स महोत्सवात तिने केलेलं ड्रेसिंग. (Aaradhya Bachchan's stunning action after mom aishwara rai get trolled)

 

दरवर्षी ऐश्वर्या कान्स महोत्सवात हजेरी लावत असते आणि तिच्या देखण्या सौंदर्याने, नजाकतीने डिझाईन करण्यात आलेल्या आऊटफिट्सने सगळ्या जगाचंच लक्ष वेधून घेत असते. पण यावर्षी मात्र ऐश्वर्याची जादू थोडी फिकी पडल्याचं अनेकांना वाटतं. कारण तिच्या कपड्यांमुळे ती यावर्षी  ट्रोल झाली.

उन्हाळ्यात फुलझाडांची पानं सुकली- पिवळी पडून गळू लागली? २ सोपे उपाय- पानाफुलांना येईल बहर

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी तिने काळ्या रंगाचा गाऊन घातला होता आणि या गाऊनवर गोल्डन रंगाचं मेटालिक वर्क करण्यात आलं होतं. अनेक जणांना तिचा हा ड्रेस मुळीच आवडला नाही. तो एखाद्या आर्ट ॲण्ड क्राफ्टच्या प्रोजेक्टसारखा दिसतो आहे, असं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केलं.

 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तिने मोरपंखी रंगाचा अतिशय घेरदार आणि मागच्या बाजुने फ्लोटिंग असणारा गाऊन घातला होता. तिचा हा गाऊनही अनेकांना आवडला नाही. त्यामुळे एकंदरीतच ती बरीच ट्रोल झाली.

शरीरातील व्हिटॅमिन D ची कमतरता दाखवून देणारी ५ लक्षणं- हा त्रास वेळीच ओळखा, नाहीतर....

महोत्सव संपल्यानंतर ती जेव्हा मुंबईला परत आली तेव्हा आराध्याने पांढऱ्या रंगाचा स्वेटशर्ट घातला होता. त्यावर लाल रंगाचा मोठा बदाम होता आणि त्यावर "Mas amor por favor" असे शब्द लिहिले होते. त्याचा इंग्रजीतून "More love, please" असा अर्थ होतो. आईला ट्रोल करू नका. तिला आणखी प्रेम द्या, असं तर तो शर्ट घालून आराध्या ट्रोलर्सला सुचवत नाही ना? असा अर्थ तिच्या त्या कृतीतून काढला जात आहे.

 

Web Title: Aaradhya Bachchan's stunning action after mom aishwara rai get trolled in cannes festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.