Join us

Viral Food Experiment : इडली चिडली, ट्विटरवर पिठाचा राडा; नेहमीसारखे तांदूळ भिजवून करावी इडली, की शिजवून घ्यावे आधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 12:00 IST

Viral Food Experiment : या प्रयोगाचे उद्दिष्ट दोन पिठांचे पोत आणि त्यापासून तयार केलेल्या इडल्या आणि डोसे यांच्यातील फरक शोधण्याचा होता.

दक्षिण भारतीय पाककृती  भारतीयांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक बनले आहे. गरमागरम इडल्या असोत, कुरकुरीत डोसे असोत, अप्पम असोत किंवा कुरकुरीत वडे. तांदूळ आणि डाळ हे अनेक दक्षिण भारतीय पदार्थ बनवण्यासाठी प्रामुख्यानं वापरले जातात, रात्रभर आंबवून डोसा किंवा इडलीचं पीठ तयार केलं जातं.  दक्षिण भारतीय पिठ तयार करण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत - कच्चे तांदूळ किंवा उकडलेले तांदूळ वापरून. अलीकडेच, अन्न संशोधक श्वेता  शिवकुमार यांनी दोन पिठांची तुलना करणारा एक अनोखा प्रयोग केला आहे. 

हे ट्विट श्वेता शिवकुमार यांनी  @Upgrade_My_Food या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. या अनोख्या प्रयोगाला 2.8k पेक्षा जास्त लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आणि रिट्विट्स मिळाले आहेत. यात त्यांनी स्पष्ट केले की ती कच्च्या तांदळापासून बनवलेली इडली आणि उकडलेले तांदूळ यातील फरक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रयोगाचे उद्दिष्ट दोन पिठांचे पोत आणि त्यापासून तयार केलेल्या इडल्या आणि डोसे यांच्यातील फरक शोधण्याचा होता.

 पॅराग्लायडिंग करताना घाबरली तरूणी, म्हणते 'अजून माझं लग्न झालं नाही'; समोरुन आलं भन्नाट उत्तर  

प्रथम, शिवकुमार यांनी तांदूळ भिजवले आणि नंतर उडीद डाळ आणि पाणी यांचे समान गुणोत्तर वापरून दोन्ही मिश्रण बारीक केले. उकडलेल्या तांदळाच्या तुलनेत कच्च्या तांदळाचं पीठ जास्त गुळगुळीत असल्याचे त्यांच्या  लक्षात आले. त्यानंतर, त्यांनी दोन पिठांना आंबवले आणि पाहिले की कच्चं इडलीचं पिठ आंबायला जास्त वेळ लागतो. पिठात बनवलेल्या इडल्या आणि डोसाबाबत संशोधकांनी सांगितले की, उकडलेल्या तांदळाच्या पिठात इडली अधिक मऊ होते. दुसरीकडे, डोसा, कच्च्या तांदळाच्या पिठात बनवल्यास तो अधिक कुरकुरीत आणि चवदार होते.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.