दिवाळी (Diwali 2025) म्हटलं की फराळासोबतच जेवणात काहीतरी खास आणि चटकदार हवं. सणासुदीच्या दिवसात गोड-धोड खाऊन कंटाळलेल्या जिभेला थोडा आराम देण्यासाठी आणि जेवणाला शाही लूक देण्यासाठी 'व्हेज पुलाव' हा उत्तम पर्याय आहे (Cooking Hacks). रंगीबेरंगी भाज्या, सुगंधी खडे मसाले आणि बासमती तांदळाचा वापर करून केलेला हा पुलाव दिवाळीच्या मेजवानीची शान वाढवतो. कमी वेळात तयार होणारा, झटपट आणि चविष्ट व्हेज पुलाव कसा करायचा, पाहूया सोपी कृती, जी तुमच्या दिवाळीच्या जेवणात नक्कीच रंगत भरेल. (How To Make Veg Pulav)
पुलावसाठी लागणारं साहित्य
बासमती तांदूळ: १ कप
तूप किंवा तेल: २ चमचे
कांदा: १ मध्यम (उभा चिरलेला)
आले-लसूण पेस्ट: १ चमचा
भाज्या (गाजर, वाटाणे, फरसबी, बटाटा): १ कप
खडे मसाले-
तमालपत्र: १
दालचिनीचा तुकडा: १
लवंगा: २
वेलची: २
हळद: आवश्यकतेनुसार
लाल तिखट: आवश्यकतेनुसार
पुलाव मसाला: १ चमचा
मीठ: चवीनुसार
पाणी: १.५ कप
पुलावची सोपी रेसिपी
बासमती तांदूळ स्वच्छ धुवून १५ मिनिटे भिजवा आणि नंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून ठेवा. सर्व भाज्या (गाजर, फरसबी, बटाटा) चिरून तयार ठेवा. एका जाड बुडाच्या भांड्यात (किंवा कुकरमध्ये) तूप/तेल गरम करा. त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंगा आणि वेलची हे खडे मसाले घाला. मसाले फुलले की उभा चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
उरलेल्या चपातीचे करा मऊ, तोंडात टाकताच विरघळतील असे गुलाबजाम; १० मिनिटांत होतील
आता आले-लसूण पेस्ट घालून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतवून घ्या. त्यानंतर लगेच चिरलेल्या भाज्या (गाजर, वाटाणे इ.) घाला आणि २-३ मिनिटे परतून घ्या. हळद, लाल तिखट आणि पुलाव मसाला घालून चांगले मिसळा. नंतर भिजवलेले तांदूळ हलक्या हाताने मसाल्यात मिसळा. तांदूळ तुटणार नाहीत याची काळजी घ्या.
जेवणासाठी करा गावरान पद्धतीची शेवची भाजी; सोपी रेसिपी, ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी होईल
या मिश्रणात अंदाजे दीड कप गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. एक उकळी आल्यावर, भांडे झाकण ठेवून मंद आचेवर १० ते १२ मिनिटे शिजवा गरमागरम आणि सुगंधी व्हेज पुलाव कोथिंबीरने सजवून रायता, दही किंवा कढीसोबत दिवाळीच्या मेजवानीसाठी सर्व्ह करा.