Join us

Veg Kurma Vegetable Korma : भात किंवा चपातीबरोबर खायला करा व्हेज कुर्मा; ही घ्या सोपी रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 15:57 IST

Veg Kurma Vegetable Korma : या रेसेपीसाठी फक्त भाज्या निवडून ठेवाव्या लागतील आणि भाज्याचं साहित्य तयार करून ठेवावं लागेल.

हिवाळ्यात बाजारात ताज्या, हिरव्याहार भाज्या दिसायला सुरूवात होते. या भाज्यांचा वापर करून तुम्ही पुलाव, व्हेज कुर्मा असे अनेक पदार्थ बनवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही.(Veg Kurma Vegetable Korma) फक्त भाज्या निवडून ठेवाव्या लागतील आणि भाज्याचं साहित्य तयार करून ठेवावं लागेल. या लेखात व्हेज कुर्मा बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (Best veg kurma recipe)

साहित्य

अर्धा ताजे नारळ किंवा 1/2 कप डेसिकेटेड कोकोनट

30 काजू

१ चमचा चणा डाळ

१ टीस्पून धणे 

१ टीस्पून बडीशेप

१ टीस्पून जिरे

२ हिरव्या मिरच्या

४ लसूण पाकळ्या

१ इंच आले

५ मिरपूड

२ काळ्या लवंगा

२ चमचे खसखस ​​(विशेष)

गुळगुळीत पेस्ट करण्यासाठी थोडे पाणी घाला.

ग्रेव्हीसाठी

3 चमचे तेल

1 कांदा

1 टीस्पून हळद

2 चमचे लाल मिरची पावडर

2 तमालपत्र

1 टोमॅटो

1 गाजर

१ वाटी हिरवे वाटाणे

१/२ कप फुलकोबी

1 लहान बटाटा

आवश्यकतेनुसार पाणी

चवीनुसार मीठ

काही चिरलेली कोथिंबीर.

कुर्माची पेस्ट घातल्यानंतर ५-१० मिनिटे मंद आचेवर शिजवा, नंतर इतर साहित्य घाला. मग १० ते १५ मिनिटं शिजवा, तयार आहे गरमागरम कुर्मा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स