रोजच्या जेवणात रंगत आणायची असेल तर लोणचं, कोशिंबीर, चटणी असे पदार्थ तोंडी लावायला पाहिजेतच. या पदार्थांच्या जोडीने महाराष्ट्रातले बहुसंख्य लोक आणखी एक पदार्थ हमखास तोंडी लावतात आणि तो म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा. आता प्रत्येक घरानुसार ठेचा करण्याची पद्धत बदलत जाते. पण ठेच्याप्रती मराठी माणसांना असणारं प्रेम मात्र सगळीकडे सारखंच आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा तर आपण नेहमीच करतो (how to make varhadi thecha?). आता त्यात थोडा बदल करा आणि ओल्या लाल मिरच्यांचा वऱ्हाडी ठेचा करून पाहा (how to make red chili chutney?). हा ठेचाही अतिशय चवदार लागतो.(Varhadi Thecha Recipe In Marathi)
लाल मिरच्यांचा वऱ्हाडी ठेचा कसा करावा?
साहित्य
अर्धी वाटी ओल्या लाल मिरच्या
एका लिंबाचा रस
१० ते १२ लसणू पाकळ्या
पपईचं झाड नुसतंच वाढलं- फळाचा पत्ताच नाही? ३ खतं घाला- भरभरून पपई येतील
एक ते दिड इंच आल्याचा तुकडा
१ चमचा जीरे
१ चमचा तेल
चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी मिरच्या स्वच्छ धुवा आणि पुसून कोरड्या करून घ्या. मिरच्यांमध्ये पाण्याचा ओलसरपणा राहिला तर ठेचा लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे मिरच्या पुर्णपणे कोरड्या झाल्याशिवाय त्या ठेचा करायला घेऊ नका. मिरच्यांची देठं काढून टाका.
व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास वाढून पोटऱ्यांवर काळ्या- निळ्या रेषांचं जाळं? ५ उपाय- त्रास कमी होईल
यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात मिरच्या आणि लसूण घालून हलकं परतून घ्या. खूप जास्त परतून घेऊ नये.
यानंतर गॅस बंद करा. मिरच्या आणि लसूण थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि त्यावेळी त्यात लिंबू पिळा तसेच आलं किसून घाला.
तज्ज्ञ सांगतात सकाळी 'या' वेळेला व्यायाम करा- दुप्पट फायदे मिळतील, दिवसभर एनर्जी टिकून राहील
याचवेळी त्यात थोडे जिरेही घाला आणि सगळे पदार्थ मिक्सरमधून अगदी बारीक फिरवून घ्या. हा ठेचा एका वाटीमध्ये काढून घ्या आणि त्यात चवीनुसार मीठ घाला. झणझणीत वऱ्हाडी ठेचा झाला तयार. हा ठेचा तुम्ही असाही खाऊ शकता किंवा आयत्यावेळी त्यात फोडणी घालूनही खाऊ शकता.