lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > Vada Pav Recipe :  पावसाात घरबसल्या स्वादिष्ट, खमंग वडापावचा आनंद घ्या; ही घ्या झटपट, सोपी रेसेपी

Vada Pav Recipe :  पावसाात घरबसल्या स्वादिष्ट, खमंग वडापावचा आनंद घ्या; ही घ्या झटपट, सोपी रेसेपी

Vada Pav Recipe : सध्या लॉकडाऊन आणि त्यातल्या त्यात धो धो कोळसणारा पाऊस अशावेळी बाहेरचं खाणं कितपत सुरक्षित ठरेल असा प्रश्न अनेकांना पडतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 05:12 PM2021-07-19T17:12:59+5:302021-07-19T17:25:18+5:30

Vada Pav Recipe : सध्या लॉकडाऊन आणि त्यातल्या त्यात धो धो कोळसणारा पाऊस अशावेळी बाहेरचं खाणं कितपत सुरक्षित ठरेल असा प्रश्न अनेकांना पडतो.

Vada Pav Recipe : Instant, easy recipe ofVadapav Enjoy the delicious Vadapav in rainy season | Vada Pav Recipe :  पावसाात घरबसल्या स्वादिष्ट, खमंग वडापावचा आनंद घ्या; ही घ्या झटपट, सोपी रेसेपी

Vada Pav Recipe :  पावसाात घरबसल्या स्वादिष्ट, खमंग वडापावचा आनंद घ्या; ही घ्या झटपट, सोपी रेसेपी

Highlightsघरच्याघरी खमंग, कुरकुरीत वडापाव तयार करून तुम्ही कुटुंबासह वडापावचा आनंद घेऊ शकता.  अगदी कमीत कमी वेळात घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही गरमगागरम वडे आणि चटणी तयार करू शकता.

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की मुंबईचा वडापाव जगभरात फेमस आहे. व्यक्ती किती डाएटिंगवर असो वडापाव खाण्याचा मोह काही आवरला जात नाही. अगदी कमीत कमी पैशात मिळणारा  वडापाव सगळ्यांनाच आवडतो. पण सध्या लॉकडाऊन आणि त्यातल्या त्यात धो धो कोळसणारा पाऊस अशावेळी बाहेरचं खाणं कितपत सुरक्षित ठरेल असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण पावसाळ्यात अनेकदा बाहेरचे उघड्यावरचे अन्नपदार्थ बॅक्टेरिअल इन्फेक्शन पसरण्याचे कारण ठरतात. 

त्यापेक्षा घरच्याघरी खमंग, कुरकुरीत वडापाव तयार करून तुम्ही कुटुंबासह वडापावचा आनंद घेऊ शकता.  अगदी कमीत कमी वेळात घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही गरमगागरम वडे आणि चटणी तयार करू शकता. पाव किंवा ब्रेड बाहेरून आणून तुम्ही वड्यांचा आस्वाद घेऊ शकता. तर काहीजणांना चपातीसह बटाटावडा खायला खूप आवडतो. ही सोपी, रेसेपी नक्की ट्राय करून पाहा. 

साहित्य

5 ते 6 उकडलेले बटाटे

2 कप चण्याचं पीठ

1/2 कप आलं लसूण मिरची पेस्ट

1/2 टीस्पून जीरं ,

1/2 टीस्पून मोहरी,

4-6 कडीपत्ता

1/2 टीस्पून हळद

कोथिंबीर

मीठ चवीनुसार

तेल तळण्यासाठी

तळलेल्या मिरच्या

मक्याचा चिवडा आवडीनुसार

कृती

सगळ्यात आधी बटाटे उकडवून सालं काढून घ्या आणि एका जाडसर काप करून घ्या.

पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात आलं लसूण, कडिपत्ता पेस्ट छान परतून घ्या. नंतर त्यात हळद,उकडलेले बटाटे घालून चांगले मॅश करून घ्या.

नंतर त्यात कोथिंबीर,मीठ घालून ५ मिनिटं भाजी परतून थंड करून घ्या.

पिवळ्या बटाट्याच्या भाजीप्रमाणे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. काहीजण अशा भाजीला बटाट्याची उसळ असंही म्हणतात. 

वडापावचं बाहेरचं आवरण तयार करण्यासाठी १ एका बाऊलमध्ये बेसन, चिमूटभर हळद, मीठ, अंदाजे पाणी घालून छान मध्यम घनतेचे चे मिश्रण तयार करा. हे मिश्रण जास्त पातळ असू नये नाहीतरी बटाट्याच्या गोळ्यांना व्यवस्थित लागणार नाही. 

तयार बॅटर मधे वडे घोळवून गरम तेलात मध्यम आचेवर वडे तळून घ्या. चटणी तयार करण्यासाठी उरलेल्या बॅटरचे चमच्याने भजी तळून त्याचा पातळसर,कडक चूरा तळून घ्या. तयार चूरा,लाल तिखट,मीठ, लसूण घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यानंतर वडे चटणी, तळलेल्या मिरच्या पावासोबत सर्व्ह करा. चण्याच्या पिठाचा उरलेला चुरा, चटणी तुम्ही पावासोबत खाऊ शकता.

Web Title: Vada Pav Recipe : Instant, easy recipe ofVadapav Enjoy the delicious Vadapav in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.