Lokmat Sakhi >Food > Shravan Food : भगरीचा उपमा म्हणजे पचायला हलका आणि पौष्टिक, उपवास केल्याचं सार्थक! पाहा रेसिपी...

Shravan Food : भगरीचा उपमा म्हणजे पचायला हलका आणि पौष्टिक, उपवास केल्याचं सार्थक! पाहा रेसिपी...

Shravan Special Upvasacha Upma : Upma Recipe For Shravan Fasting : Fasting Special Upma : Shravan Fasting Special Vari Upma : Vrat Upma Recipe : उपवासाला तीच ती साबुदाण्याची खिचडी, वडे नको, मग करा मऊसूत असा वरईचा उपमा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2025 17:06 IST2025-07-30T15:27:35+5:302025-07-30T17:06:37+5:30

Shravan Special Upvasacha Upma : Upma Recipe For Shravan Fasting : Fasting Special Upma : Shravan Fasting Special Vari Upma : Vrat Upma Recipe : उपवासाला तीच ती साबुदाण्याची खिचडी, वडे नको, मग करा मऊसूत असा वरईचा उपमा...

Upma Recipe For Shravan Fasting Shravan Special Upvasacha Upma Fasting Special Upma Shravan Fasting Special Vari Upma Vrat Upma Recipe | Shravan Food : भगरीचा उपमा म्हणजे पचायला हलका आणि पौष्टिक, उपवास केल्याचं सार्थक! पाहा रेसिपी...

Shravan Food : भगरीचा उपमा म्हणजे पचायला हलका आणि पौष्टिक, उपवास केल्याचं सार्थक! पाहा रेसिपी...

श्रावण महिना म्हटलं की सणवार, उत्सव सुरु होतात. सणावाराला आपल्यापैकी काहीजण उपवास करतात. घरात एखाद्या व्यक्तीचा जरी उपवास असला तरी उपवासाचे (Shravan Special Upvasacha Upma) वेगवेगळे पदार्थ हमखास केले जातात. उपवासाच्या पदार्थांमध्ये शक्यतो साबुदाणा आणि बटाटा ( Upma Recipe For Shravan Fasting) फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. उपवासाला सारखच साबुदाण्याची खिचडी, वडे खाऊन काहीवेळा कंटाळा येतो. अशावेळी उपवासाला काहीतरी वेगळं (Fasting Special Upma) पण पौष्टिक असं खाण्याची इच्छा होते(Shravan Fasting Special Vari Upma).

उपवासाला घरोघर वरईचा भात केला जातो, आपण नेहमीच्याच या वरईला थोडा ट्विस्ट देत झटपट आणि पचायला सोपा असा वरईचा उपमा करु शकतो. पारंपरिक साबुदाणा किंवा बटाट्याच्या पदार्थांपेक्षा वरईचा उपमा (Vrat Upma Recipe) थोडा वेगळा, चविष्ट, पोषक आणि पचायला हलका असणारा उपवासाचा खास पदार्थ आहे. वरईचे  तांदूळ हा उपवासात खाल्ला जाणारा पौष्टिक पदार्थ असून त्यापासून तयार होणारा उपमा हलका, चवदार आणि झटपट तयार होतो. सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूर सांगतोय उपवासाच्या उपम्याची भन्नाट रेसिपी...

साहित्य :- 

१. पाणी - गरजेनुसार
२. सैंधव मीठ - चवीनुसार
३. वरई - १ कप (पाण्यांत भिजवून घेतलेली)
४. शेंगदाणे - २ ते ३ टेबलस्पून 
५. साजूक तूप - २ टेबलस्पून 
६. जिरे - १/२ टेबलस्पून 
७. आलं - १ टेबलस्पून (बारीक चिरलेल)
८. हिरव्या मिरच्या - ३ मिरच्या (बारीक चिरलेल्या)
९. कडीपत्ता - ४ ते ५ पानं 
१०. बटाटा - १/२ कप (उकडवून छोटे तुकडे केलेला)
११. दुध - १ कप 
१२. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

साबुदाणा न वापरता फक्त १० मिनिटांत कुकरमध्ये करा उपवासाची खीर-पौष्टिक आणि पचायलाही हलकी...


तेल तूप एक थेंबही न घालता करा मऊमोकळी साबुदाणा खिचडी! उपवास करा मजेत, खा निवांत...

कृती :- 

१. सगळ्यातआधी एका बाऊलमध्ये वरई घेऊन पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर, पाणी घालून वरई ३० ते ४० मिनिटे भिजवून घ्यावी. 
२. आता एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करुन घ्यावे. गरम पाण्यांत चवीनुसार सैंधव मीठ घालावे, त्यानंतर यात भिजवलेली वरई घालून ती व्यवस्थित पाण्यात फुलवून घ्यावी. 
३. वरई ३ ते ५ मिनिटे पाण्यांत फुलवून घेतल्यानंतर ती गाळणीच्या मदतीने गाळून त्यातील जास्तीचे पाणी काढून घ्यावे. मग वरई एका बाऊलमध्ये काढून थोडी थंड होऊ द्यावी. 

श्रावणातील पदार्थ खास करा डाळिंबी भात! जेवणाची वाढेल लज्जत - खा पोटभर निवांत...

४. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात शेंगदाणे खरपूस तळून घ्यावेत. मग शेंगदाणे काढून घेऊन त्यात तेलात जिरे, बारीक चिरलेल आलं, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कडीपत्ता घालून खमंग अशी फोडणी तयार करावी. यात उकडवून घेतलेल्या बटाट्याचे तुकडे घालून ते तेलात परतावे. 
५. तयार मिश्रणात शिजवून घेतलेली वरई घालावी. त्यानंतर यात आपण आपल्या आवडीनुसार दूध किंवा पाणी घालून उपम्याची कंन्सिस्टंसी सेट करु शकता. 
६. सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व तळलेले शेंगदाणे भुरभुरवून घालावेत. 

उपवासाचा गरमागरम उपमा खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Upma Recipe For Shravan Fasting Shravan Special Upvasacha Upma Fasting Special Upma Shravan Fasting Special Vari Upma Vrat Upma Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.