बालूशाही हा उत्तर भारतात लोकप्रिय असलेला पारंपरिक गोड पदार्थ आहे. बाहेरुन कुरकुरीत आणि आतून थोडा मऊ व साखरेच्या पाकात मुरलेला असा हा पदार्थ फारच रुचकर लागतो. या पदार्थाची खासियत म्हणजे त्याच्या लेयर्स असते. दिसायला तो डोनटसारखा भोक असलेला गोल आकाराचा असतो, पण चव आणि पोत पूर्णपणे वेगळी असते. बालूशाही प्रामुख्याने मैद्यापासून तयार केली जाते आणि तळल्यानंतर साखरेच्या पाकात बुडवली जाते. त्यामुळे तिच्या बाहेरच्या आवरणावर हलका साखरेचा थर तयार होतो. (UP style balushahi recipe, traditional balushahi, crispy outside soft inside sweet, North Indian mithai)काही ठिकाणी वरून पिस्ता, बदाम यांची सजावटही केली जाते.
हा पदार्थ सण-समारंभ, लग्नकार्य, दिवाळी किंवा इतर खास प्रसंगी आवर्जून केला जातो. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि मध्य प्रदेश या भागांत तो विशेष प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतात याच्यासारखा दिसणारा 'बादुशा' नावाचा प्रकार आढळतो, ज्याची चव आणि रेसिपी थोडी वेगळी असते. चवीला जवळपास सारखेच असतात.
साहित्य
मैदा, मीठ, तूप, पाणी, साखर, वेलची पूड
कृती
१. एका परातीत मैदा घ्यायचा. त्यात वाटीभर गरम तूप घालायचे. अगदी थोडे मीठ घालायचे. हाताने मैदा छान मिक्स करायचा. त्यात कोमट पाणी ओतून त्याचे पीठ मळून घ्यायचे. पुरीसाठी मळतात तसे पीठ मळायचे. नंतर दहा मिनिटे ओल्या फडक्याने झाकून ठेवायचे.
२. नंतर हाताने कणीक छान मळायची. मळून झाल्यावर जाडसर पोळी लाटा. अगदी जाडसर. सुरीने मधोमध कापा. एक बाजू दुसऱ्या बाजूवर ठेवा. पुन्हा मधोमध कापा. असे तुकडे लहान होईपर्यंत करायचे. शेवटी बऱ्याच पट्ट्या तयार होतात. मग त्याचे गोल कयार करायचे. पेढ्याच्या आकाराचे करायचे. मधे गोल करायचा, तुपात तळून घ्यायचे. खमंग परतून घ्यायचे.
३. एका कढईत तूप साखर घ्यायची. त्यात पाणी घालायचे. उकळायचे आणि मस्त पाक तयार करायचा. त्यात वेचली पूड घालायची. ढवळायचे. पाक गार झाला की त्यात तळलेल्या बालूशाही घालायच्या. जरा घोळवायच्या आणि मग काढून घ्यायच्या. जरा सेट होऊ द्यायच्या. चवीला फारच मस्त लागतात.
