साऊथ इंडियन पदार्थ (South Style Coconut Chutney) नाश्त्याला खायला अनेकांना आवडतं. इडली, डोसा किंवा मेदूवडा, डाळ वडा, नीर डोसा सगळ्या पदार्थांमध्ये कॉमन असते ती म्हणजे चटणी. ओल्या नारळाची चटणी पदार्थाची चव वाढवते आणि चवीलाही उत्तम असते (How To Make Hotel Style Coconut Chutney). हॉटेलमध्ये करतात तशी ओल्या नारळाची चटणी घरी करणं एकदम सोपं आहे. नारळाची चटणी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. यासाठी तुम्हाला जास्त पदार्थ लागणार नाहीत. घरात जे काही उपलब्ध आहे त्याचा वापर करून तुम्ही चवदार, चविष्ट चटणी करू शकता. (South Indian Style Coconut Chutney Recipe)
ओल्या नारळाच्या चटणीसाठी लागणारं साहित्य
१) ओल्या नारळाचे काप -1 वाटी
२) हिरवी मिरची 3-4
३) फुटाणे डाळ/डाळवं - 2 चमचे
४) आल्याचा तुकडा- 1 इंच
५) लसूण पाकळ्या - 2-3
६) कोथिंबीर -मूठभर
७) साखर-1/2 चमचा
८) लिंबाचा रस -1/2 चमचा
९) मीठ -चवीनुसार
१०) पाणी -आवश्यकतेनुसार
फोडणीसाठी लागणारं साहित्य
१) तेल -1 मोठा चमचा
२) मोहरी-1/2 चमचा
३) जिरे -1/4 चमचा
४) हिंग -चिमूटभर
५) कढीपत्ता 7-8 पाने
६) सुक्या लाल मिरच्या-2-3
ओल्या नारळाची चटणी करण्याची सोपी रेसिपी
सगळ्यात आधी मिक्सरमध्ये नारळाचे काप, हिरवी मिरची, डाळ (डाळवं), आलं, लसूण, कोथिंबीर, साखर, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र घ्या. प्रथम हे सर्व पाण्याशिवाय जाडसर वाटून घ्या.
आता त्यात थोडे-थोडे पाणी घालून गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत बारीक वाटून घ्या. चटणीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. वाटलेली चटणी एका सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून घ्या.
चटणीला फोडणी कशी द्यावी?
एका छोट्या कढईत किंवा तडका पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर जिरे घाला. त्यानंतर चिमूटभर हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून चांगले परतून घ्या. ही तयार झालेली खमंग फोडणी लगेच चटणीवर ओता. फोडणी हलक्या हाताने चटणीत मिसळून घ्या.
Web Summary : Make South Indian-style coconut chutney at home easily! This recipe uses simple ingredients for a tasty, flavorful side dish perfect with idli, dosa, or vada. The recipe includes a simple tempering for added flavor.
Web Summary : साउथ इंडियन स्टाइल नारियल की चटनी आसानी से घर पर बनाएं! यह रेसिपी इडली, डोसा या वड़ा के साथ परोसने के लिए सरल सामग्री का उपयोग करके एक स्वादिष्ट चटनी बनाने की विधि बताती है। स्वाद के लिए तड़का भी शामिल है।