चपात्या (Chapati) सर्वांच्याच घरी केल्या जातात. सणासुधीला अशा उरलेल्या चपात्यांचं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. अन्न वाया न घालवता, त्या उरलेल्या चपात्यांचा वापर करून एक अप्रतिम आणि तोंडाला पाणी आणणारा गोड पदार्थ तुम्ही करू शकता तो म्हणजे 'गुलाबजाम'. (How To Make Gulab Jam From Leftover Chapati) अगदी कमी वेळेत, कमी खर्चात आणि घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यात हे गुलाबजाम तयार होतात. विकतच्या गुलाबजामसारखीच चव देणारे, रसाळ आणि मऊ लुसलुशीत चपातीचे गुलाबजाम कसे करायचे याची सोपी आणि हटके रेसिपी पाहूया.
चपातीचे गुलाबजाम करण्यासाठी लागणारं साहित्य
उरलेल्या चपात्या -३ ते ४
गरम दूध- १ कप
मिल्क पावडर -१.५ कप
तूप - २ चमचे
बेकिंग पावडर १-/२ चमचा
वेलची पूड -१/२ चमचा
चिमूटभर- मीठ
तळण्यासाठी तेल किंवा तूप
पाकासाठी
साखर- १ कप
पाणी -१ कप वेलची किंवा केसर
शिळ्या चपात्यांचे छोटे तुकडे करा आणि एका भांड्यात घ्या. त्यावर कोमट दूध टाकून 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवा, जेणेकरून त्या मऊ होतील. भिजलेल्या चपात्या हाताने चांगल्या मळून घ्या. त्यात गुठळी राहू नये.
या मिश्रणात वेलची पावडर आणि आवश्यक असल्यास मैदा (किंवा रवा) घालून चांगले मळून घ्या. हा गोळा पारंपरिक गुलाबजामच्या गोळ्यासारखा मऊ असावा.
भिजवलेल्या मिश्रणात तूप, बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ आणि मिल्क पावडर घालून हाताने मळून घ्या. गोळा अगदी घट्ट नसावा. गरज वाटल्यास थोडेसे दूध घाला.
पाक कसा तयार कराल?
एका भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून गरम करा. साखर विरघळल्यावर ३-४ मिनिटे उकळून घ्या. पाक चिकट झाला की गॅस बंद करा. गुलाबजाम तळा तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे गोल किंवा दंड गोलाकार गोळे (गुलाबजाम) करा.
कढईत तेल/तूप गरम करून मध्यम आचेवर हे गुलाबजाम सोनेरी तपकिरी रंगावर तळून घ्या. तळलेले गरम गुलाबजाम कोमट पाकात लगेच टाका आणि किमान १ ते २ तास मुरू द्या, जेणेकरून ते रसाळ आणि मऊ होतील.