आपण यूट्यूबवर वजन कमी करण्यासाठीचे बरेच व्हिडिओ बघतो. अनेक व्हिडिओंमध्ये 'हे एक ड्रिंक करेल पोटाची चरबी गायब' अशा प्रकारचे दावे असतात. (Tulsi-Jaggery-Cardamom Tea, See An Effective Drink)आणि अशा दाव्यांना आपण बळी पडतो. 'दोन दिवसात दोन किलो कमी' असे दावे करून ते तुम्हाला भुरळ पाडतात. मग आपणही त्यांची पावडर विकत घेतो आणि फसतो. (Tulsi-Jaggery-Cardamom Tea, See An Effective Drink)मुळात वजन असं एका पेयाने कमी करता येत नाही. पण अशी पेये नक्कीच आहेत, जी वजन कमी करण्यात मदत करतात. शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी मदत करतात. पण त्याबरोबर योग्य व्यायाम, आहार, झोप, सगळंच गरजेचं असतं.
एक असं पेय आहे, जे घरच्या घरी तयार करू शकता. त्याचा वजन कमी करण्यापासून, शरीराला पोषकतत्त्वे पुरवण्यापर्यंत मदत होते. (Tulsi-Jaggery-Cardamom Tea, See An Effective Drink)नियमितपणे या पेयाचे सेवन केलेत तर शरीराला फायदेशीर ठरेल. चवीलाही हे चांगलेच लागते. सकाळच्या चहाऐवजी किंवा चहा आधी हे पिऊ शकता. दिवसातून दोनदा पिऊ शकता. जास्त प्यायल्यास पित्त होण्याची शक्यता आहे.
साहित्य:
तुळस, वेलची, दालचिनी, पुदिना, गूळ, आलं, पाणी
कृती:
१. एका भांड्यात पाणी घ्या आणि थोडं गरम होऊ द्या.
२. पाणी थोडं उकळायला लागल्यावर त्यात तुळस घाला. वेलची सोलून घातलीत की तिची सालेही वापरा. दालचिनी व आलं घाला. अगदी थोडा पुदिना घाला. पुदिना अति झाला तर उग्र लागेल. आता सगळं व्यवस्थित उकळू द्या.
३. जर एक कप तयार करायचे असेल, तर दोन कप पाणी घ्या. पाणी अर्ध्यापर्यंत आटवून घ्या. जरा जास्त वेळ उकळा. जेणेकरून सर्व सत्व पाण्यात उतरतील. नंतर थोडा चवीपुरता गूळ घाला. साखरेपेक्षा गूळ चांगला. जर साखर वापरलीत तर वजन कमी करण्यात पेय कामी येणार नाही.
४. गूळ विरघळल्यानंतर पेय गाळून घ्या. गरमागरम प्या.
शरीरातील टॉक्सिन्स कमी करण्यासाठी मदत होईल. पोट साफ होईल. सर्दी, खोकला वरचेवर होत असेल तर, त्याचे प्रमाणही हळूहळू कमी होईल. चेहर्यासाठीही फायदेशीर ठरेल. सतत चहाची तलप लागत असेल तर, तीही कमी होईल. पचनसंस्थेसाठी उपयुक्त असे हे पेय आहे. नक्की तयार करा आणि पिऊन बघा.