महाराष्ट्रात नाश्त्यासाठी फार कष्ट घेऊन रोज काही वेगळे करण्याऐवजी उरलेल्या पदार्थांना फोडण्या देऊन त्याचा चविष्ट पदार्थ तयार करण्याची पद्धत जास्त लोकप्रिय आहे. अन्न वायाही जात नाही आणि या रेसिपी फारच चविष्ट आणि वेळ वाचवणाऱ्या असतात. (Try this perfect recipe for phodnicha bhaat, just like mom makes it, must have for breakfast )फोडणीची पोळी, भाकरी, तसेच फोडणीचा भात. विविध प्रकारे हा भात करता येतो. काहींना गोडसर आवडतो तर काहींना एकदम झणझणीत. पण लहानपणी आजी जसा पिवळा भात द्यायची.त्याची चव मात्र वेगळीच होती. तसाच फोडणीचा भात करायचा असेल तर ही रेसिपी पाहा. जास्त काही पदार्थ न वापरता या पद्धतीने करुन पाहा. लहानपणीची आठव लगेच येईल. चवही जिभेवर रेंगाळत राहील.
साहित्य भात, कांदा, शेंगदाणे, कडीपत्ता, मोहरी, तेल, जिरे, कोथिंबीर, हळद, मीठ, हिरवी मिरची, मीठ
कृती१. शिळा भात असेल तर फोडणीचा भात जास्त चविष्ट लागतो. त्यामुळे शिळा भात घ्यायचा. एका कढईत तेल घ्यायचे. त्यावर शेंगदाणे परतून घ्यायचे. शेंगदाणे काढून घ्यायचे आणि तेलावर चमचाभर जिरे घालायचे. जिरं छान फुलू द्यायचं. जिरं फुलल्यावर त्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची.
२. मोहरी तडतडल्यावर त्यात कडीपत्याची पाने घालायची. कडीपत्ता परतून झाल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. हिरवी मिरची जास्त वापरायची. म्हणजे चव छान लागते. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. कांदाही जास्त वापरा. हिरवी मिरची परतून झाल्यावर त्यात कांदा घालायचा. कांदाही मंग गुलाबी परतायचा. त्यात शेंगदाणे घालायचे आणि चमचाभर हळद घालून परतायचे. मीठही घालायचे. काही मिनिटे परतून झाल्यावर त्यात मोकळा केलेला भात घालायचा.
३. भात घातल्यावर व्यवस्थित ढवळायचे आणि त्यावर झाकण ठेवायचे. मस्त वाफ काढायची. त्यात चवीनुसार मीठ घालायचे. ताजी कोथिंबीर निवडायची आणि मग बारीक चिरुन घ्यायची. कोथिंबीर घालून पुन्हा दोन मिनिटे भात परतायचा. अगदी लहानपणी खाल्ला असेल तसाच होतो.
Web Summary : Craving mom's phodnicha bhaat? This recipe recreates that nostalgic taste using leftover rice. Temper spices, peanuts, and onions. Add rice, steam, garnish with cilantro, and enjoy a flavorful childhood memory.
Web Summary : माँ के हाथ का फोडणीचा भात चाहिए? बची हुई चावल से यह रेसिपी बनाएं। मसाले, मूंगफली, प्याज भूनें। चावल डालकर भाप दें, धनिया से सजाएं, और बचपन की यादों का स्वाद लें।