अनेक प्रकारचा चिवडा करता येतो. चवीला सगळेच वेगळे आणि मस्त असतात. त्यामुळे घरोघरी चिवड्याचे डबे भरलेले असतात. महाराष्ट्रात चिवडा हा पदार्थ नाश्त्यासाठी म्हणूनही खाल्ला जातो. विविध प्रकारच्या चिवड्यांपैकी एक प्रकार म्हणजे जाड पोह्याचा चिवडा तो ही तळलेला. असा तळलेला चिवडा अगदी पटकन होतो आणि चवीला छान लागतो. (Try the deep fried Chivda of thick poha, rich in flavor - easy to make)त्यात पिवळी शेव घातली आणि खाताना थोडा लिंबू पळला तर स्वाद आणखी वाढतो. अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की करुन पाहा. लहान मुलांना डब्यात देण्यासाठी मस्त पदार्थ आहे.
साहित्य जाड पोहे, तेल, कडीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, काजू, सुकं खोबरं, डाळं, मीठ, आमचूर पूड, पिठीसाखर
कृती१. जाड पोहे न वाळवता घ्यायचे. म्हणजे ते छान तळले जातात. एका कढईत तेल तापवायचे. तेल छान गरम झाल्यावर मोठ्या चाळणीत जाड पोहे घ्यायचे आणि ते तळून घ्यायचे. मस्त खमंग कुरकुरीत तळायचे. तळायला जास्त वेळ लागत नाही.
२. पोहे तळून झाल्यावर एका पसरत परातीत ठेवायचे. कडीपत्त्याची पाने तळून घ्यायची. तसेच काजूचे काही तुकडे तळून घ्यायचे. सुकं खोबरं घ्यायचं आणि त्याचे लहान तुकडे करायचे. ते तुकडे तळून घ्यायचे. शेंगदाणेही तळून घ्यायचे. अर्धी वाटी डाळं घ्या. डाळही छान तळून घ्या. सारे पदार्थ चाळणीचा वापर करुनच परता. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. ते तुकडेही छान तळून घ्यायचे.
३. परातीत ठेवलेल्या पोह्यांत तळलेले इतर पदार्थ मिक्स करायचे. काजू तसेच कडीपत्ता , सुकं खोबरं, डाळं, शेंगदाणे सारे पदार्थ घ्यायचे. त्यात चमचाभर आमचूर पूड घालायची. तसेच चमचाभर पिठीसाखर घालायची. चवी पुरते मीठ घालायचे आणि सारे पदार्थ एकत्र करायचे. मस्त एकजीव करायचे. हवाबंद डब्यात चिवडा ठेवायचा. महिनाभर टिकतो. चवीला अगदी मस्त लागतो. नक्की करुन पाहा.
Web Summary : Make delicious, quick-fried thick poha chivda with simple ingredients. Add fried nuts, coconut, and spices for flavor. Perfect for kids' lunchboxes!
Web Summary : मोटे पोहे का स्वादिष्ट, झटपट तला हुआ चिवड़ा आसान सामग्री से बनाएं। स्वाद के लिए तले हुए नट्स, नारियल और मसाले डालें। बच्चों के लंचबॉक्स के लिए बिल्कुल सही!