बटाटा म्हणजे ,सगळ्यांच्या आवडीचा. विविध प्रकारची भाजी करता येते. त्यापैकी एक मस्त प्रकार म्हणजे हा लसूणी बटाटा. करायला अगदी सोपी रेसिपी आहे. (Try out garlic potato gravy, very tasty and easy recipe, if you like garlic this recipe is just for you )तसेच करायला अगदी सोपी आहे. लसूण पात हिवाळ्यात छान ताजी मिळते नक्की करुन पाहा.
साहित्य बटाटा, तेल, लसूण, हिरवी मिरची, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, लसूण पात, पालक, हळद, धणे पूड, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, पाणी, पनीर, कोथिंबीर, आलं
कृती१. बेबी पोटॅटो म्हणजेच दम आलूवाले बटाटे घ्यायचे. एका पॅनमध्ये तेल घ्यायचे आणि त्यात बटाटे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे. लालसर होतात. नंतर लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या, बारीक चिरायची. लसणाची पात घ्यायची आणि बारीक चिरायची. तसेच सिमला मिरचीही चिरायची.
२. टोमॅटो घ्यायचे. त्याची पेस्ट तयार करायची. कांदा सोलायचा आणि छान बारीक असा चिरुन घ्यायचा. पालक स्वच्छ धुवायचा. जरा उकळून घ्यायचा आणि त्याची पेस्ट तयार करायची. हिरव्या मिरचीचेही बारीक तुकडे करायचे. कोथिंबीरीची ताजी जुडी निवडायची आणि नंतर स्वच्छ धुवायची. बारीक चिरायची. पनीर मस्त किसून घ्यायचे.
३. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यात बारीक चिरलेली लसूण घालायची. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. सिमला मिरची घालायची. किसलेलं आलं घालायचं आणि सगळे पदार्थ मस्त परतून घ्यायचे. छान खमंग परतून झाल्यावर त्यात पनीर घालायचे. चमचाभर गरम मसाला घालायचा. नंतर चमचाभर धणे पूड घालायची. तसेच लाल तिखट घालायचे. चमचाभर हळद घालायची. टोमॅटोची पेस्ट घालायची. खमंग परतून घ्यायची. लसूण पात घालायची. नंतर पालकाची पेस्टही घालायची. ढवळत राहायचे. मस्त एकजीव करायचे.
४. कुरकुरीत बटाटे त्यात घालायचे. थोडे पाणी घालायचे आणि ढवळून घ्यायचे. पाणी अगदी थोडे घालायचे. चवीपुरते मीठ घालायचे आणि भाजी छान परतून घ्यायची. वरतून कोथिंबीर घालायची आणि गरमागरम भाजी भाकरी, पोळी, भात कशासोबतही खाऊ शकता.
Web Summary : This easy garlic potato recipe is a flavorful dish. Crispy potatoes are combined with garlic, green chilies, capsicum, and a tomato-spinach puree. Spices and paneer enrich the taste. Garnish with coriander and serve hot with roti or rice.
Web Summary : यह आसान लहसुन आलू रेसिपी एक स्वादिष्ट व्यंजन है। कुरकुरे आलू को लहसुन, हरी मिर्च, शिमला मिर्च और टमाटर-पालक प्यूरी के साथ मिलाया जाता है। मसाले और पनीर स्वाद को समृद्ध करते हैं। धनिया से गार्निश करें और रोटी या चावल के साथ गरमागरम परोसें।