Lokmat Sakhi >Food > ढोकळा तर करताच, आता हा पालक ढोकळा करुन पाहा; अगदी सोपा व पौष्टिक

ढोकळा तर करताच, आता हा पालक ढोकळा करुन पाहा; अगदी सोपा व पौष्टिक

try making this spinach dhokla; very easy and nutritious : नाश्त्याला करा मस्त पालक ढोकळा. अगदीच सोपा. कमी सामग्रीत झटपट करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 08:45 IST2025-05-09T08:40:27+5:302025-05-09T08:45:01+5:30

try making this spinach dhokla; very easy and nutritious : नाश्त्याला करा मस्त पालक ढोकळा. अगदीच सोपा. कमी सामग्रीत झटपट करा.

try making this spinach dhokla; very easy and nutritious | ढोकळा तर करताच, आता हा पालक ढोकळा करुन पाहा; अगदी सोपा व पौष्टिक

ढोकळा तर करताच, आता हा पालक ढोकळा करुन पाहा; अगदी सोपा व पौष्टिक

पालकाची भाजी खुपदा खाल्ली असेल तसेच भजीही खाल्ली असेल. पालकाचे पदार्थ चविष्ट असतात. (try making this spinach dhokla; very easy and nutritious)मग आमटी असो वा खिचडी पालक असल्यावर चव दुप्पट होते. कधी पालकाचा ढोकळा खाल्ला आहे का? ही जरा हटके अशी रेसिपी आहे. चवीला अगदी मस्त आहे. तसेच पौष्टिकही आहे. पाहा पालक ढोकळा कसा कराल.(try making this spinach dhokla; very easy and nutritious) नाश्त्यासाठी खास झटपट रेसिपी.


साहित्य
पालक, हिरवी मिरची, आलं, रवा, दही, मीठ, लाल तिखट, मोहरी, जिरे, तेल, पांढरे तीळ, कडीपत्ता,

कृती
१. छान ताजा हिरवागार पालक आणा. व्यवस्थित निवडून घ्या. नंतर एका पातेल्यात पाणी गरम करा. त्या पाण्यात पालक घाला आणि छान उकळू द्या. पालक शिजल्यावर एका पातेलीत गार पाणी घ्या आणि त्यात पालक काढून घ्या. पालक गार झाल्यावर पाणी गाळा आणि पाने वेगळी करा. 

२. एका मिक्सरच्या भांड्यात पालकाची भाजी घ्या. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. रवा घाला तसेच त्यात दही घालायचे. आल्याचा एक तुकडाही घाला. सगळे पदार्थ मस्त एकजीव होईपर्यंत वाटून घ्या. त्याची छान पेस्ट करुन घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला. कोणत्याही पदार्थाचा तुकडा राहणार नाही याची काळजी घ्या. राहीलाच तर बाजूला करा किंवा पुन्हा वाटून घ्या. 

३. इडली पात्रात ढोकळा लाऊ शकता. नसेल तर कुकरलाही लाऊ शकता. पातेल्यात ढोकळ्याचे मिश्रण ओतायचे. आणि त्यावर लाल तिखट भुरभुरायचे. त्याची चव मस्त लागते. ढोकळा मस्त मऊ होईल मग गॅस बंद करा आणि ढोकळा ताटात काढून घ्या. सुरीने ढोकळा झाला की नाही तपासता येते. तसेच किमान अर्धा तास तरी ढोकळा व्हायला लागेल. 

४. एका कढल्यात तेल घ्या. गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे घाला. नंतर फोडणीत कडीपत्याची पाने घाला. त्यात पांढरे तीळ घालायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. सगळे छान परता आणि मग ढोकळ्यावर घाला.      

Web Title: try making this spinach dhokla; very easy and nutritious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.