Lokmat Sakhi >Food > वांग्याची 'अशी' भाजी एकदा करुन पाहा, अगदी पाच मिनिटांचे काम, चवीला एकदम भारी

वांग्याची 'अशी' भाजी एकदा करुन पाहा, अगदी पाच मिनिटांचे काम, चवीला एकदम भारी

Try making this brinjal dish once, it takes just five minutes, and tastes amazing : वांग्याची अशी भाजी नक्की करुन पाहा. चवीला मस्त करायला सोपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2025 16:51 IST2025-09-24T16:46:22+5:302025-09-24T16:51:16+5:30

Try making this brinjal dish once, it takes just five minutes, and tastes amazing : वांग्याची अशी भाजी नक्की करुन पाहा. चवीला मस्त करायला सोपी.

Try making this brinjal dish once, it takes just five minutes, and tastes amazing | वांग्याची 'अशी' भाजी एकदा करुन पाहा, अगदी पाच मिनिटांचे काम, चवीला एकदम भारी

वांग्याची 'अशी' भाजी एकदा करुन पाहा, अगदी पाच मिनिटांचे काम, चवीला एकदम भारी

वांग्याचे तेच तेच प्रकार खाऊन जर कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळे आणि चमचमीत करुन पाहा. वांग्याचे काप तसा फार लोकप्रिय पदार्थ आहे. मात्र कधी वांग्याचे असे काप खाल्ले आहेत का ? वांग्याचे असे चमचमीत काप भाजी म्हणून नक्की करुन पाहा. (Try making this brinjal dish once, it takes just five minutes, and tastes amazing)फारच चविष्ट लागतात. एकदम झणझणीत भाजी आहे. भाकरीसोबत खा किंवा भातोसोबत छानच लागेल.  

साहित्य
वांगी, तेल, लसूण, काश्मीरी लाल मिरची, मोहरी, पाणी, मीठ

कृती
१. मोठं वांगं घ्यायचं. गोलाकार वांग वापरा. लांबट वांगी नको. वांग्याचे जाड असे काप करायचे. एका वांग्याचे दोन काप केले तरी चालेल. वांगं जाडच चिरायचे. व्यवस्थित धुवायचे. टोकं काढायची. तसेच दोन्ही बाजूंनी सालं काढा म्हणजे कापासाठी जसे वांग चिरता अगदी तसंच चिरा फक्त काप जाड ठेवा. 

२. वांग्याच्या तुकड्याला मधोमध चिरा पाडा. फार खोल नको. फक्त मसाला छान मुरेल एवढीच चिर पाडायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. तसेच एका वाटीत पाणी घ्यायचे. त्यात काश्मीरी लाल मिरची भिजवायची. 

३. एका मिक्सरच्या भांड्यात लसूण घ्यायची. त्यात काश्मीरी लाल मिरची घालायची. मिरचीचे पाणी जरा काढून घ्यायचे. म्हणजे अति तिखट होणार नाही. लसूण आणि मिरचीची मस्त पेस्ट तयार करायची. छान लालसर पेस्ट तयार होते. त्यात अगदी थोडे पाणी घालून वाटा. जास्त पाणी नको. तसेच साधे पाणी घ्या. मिरची ज्यात भिजवली ते पाणी अजिबात वापरु नका. 

४. वांग्याचे काप घ्यायचे. त्याला तयार केलेली पेस्ट सगळ्या बाजूंनी व्यवस्थित लावायची. पेस्टमध्ये वांगं छान घोळवायचे. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्या. तेल जरा गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला. मोहरी छान तडतडल्यावर वांग्याचे काप तेलावर लावायचे. गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवायचे. एक वाफ काढून घ्यायची. वांगं पलटून दोन्ही बाजूंनी खमंग परतायचे. थोडे कुरकुरीत झाले आणि छान परतले गेले की गॅस बंद करा. गरमागरम भातासोबत किंवा चपाती सोबत हे काप खा. एकदम मस्त लागतात. 

  

 

English summary :
Tired of the same brinjal dishes? Try this quick and flavorful brinjal fry! Simply slice, marinate in a spicy garlic-chili paste, and pan-fry until golden. Enjoy this zesty dish with rice or roti.

Web Title: Try making this brinjal dish once, it takes just five minutes, and tastes amazing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.