Join us

पनीरची अशी भाजी कधीच खाल्ली नसेल, चवीला जबरदस्त आणि करायला अगदी सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2025 18:43 IST

try making paneer like this, it tastes amazing and is very easy to make : पनीरची अशी भाजी नक्की करुन पाहा. चवीला मस्त.

पनीरची भाजी भारतात अत्यंत आवडीने खाल्ली जाते. पनीरचे अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. पनीरच्या विविध भाज्या करतात, जसे की पनीर बटर मसाला, पालक पनीर, शाही पनीर, मटर पनीर आणि कढई पनीर इतरही अनेक प्रकार आहेत. या भाज्या त्यांच्या खास मसाल्यांमुळे आणि विशिष्ट चवीमुळे प्रसिद्ध आहेत. (try making paneer like this, it tastes amazing and is very easy to make.)त्याच त्याचे चवीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर पनीरची ही जरा हटके भाजी करुन पाहा. चवीला अगदी मस्त आहे. तसेच करायला सोपी असते. 

साहित्य पनीर, कोथिंबीर, तेल, लसूण, हिरवी मिरची, कांदा, पाणी, साय, काजू, धणे, जिरे, आलं, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ 

कृती१. पनीरचे चौकोनी तुकडे करुन घ्यायचे. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यावर धणे परतून घ्यायचे. तसेच त्यात जिरे घालायचे आणि जिरेही परतायचे. आल्याचा तुकडा तसेच लसणाच्या काही सोललेल्या पाकळ्या घ्यायच्या, हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. थोडे काजू घ्यायचे. भरपूर कोथिंबीर घालायची. सारे पदार्थ खमंग परतायचे. परतून झाल्यावर गार करत ठेवायचे. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि वाटून घ्या. त्याची मस्त हिरवी पेस्ट तयार होते. 

२. कांदा सोलून घ्यायचा आणि बारीक चिरायचा. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यावर कांदा परतून घ्यायचा. कांदा छान गुलाबीसर परतूनझाल्यावर त्यात तयार केलेली हिरवी पेस्ट ओतायची. त्यात चवी पुरते मीठ घालायचे. तसेच चमचाभर हळद आणि आवडीनुसार लाल तिखट घाला. थोडा गरम मसाला घाला आणि झाकण ठेवा. सगळे पदार्थ एकजीव होऊ द्यायचे. त्यात थोडे पाणी घाला आणि एक वाफ काढून घ्या. 

३. त्यात पनीरचे तुकडे घाला आणि ढवळा. मसाला आणि पनीर एकत्र झाल्यावर गरज असेल तर थोडे पाणी घाला आणि मग झाकण ठेवा. वाफ काढून घ्या. त्यात थोडी साय घाला ढवळा. दोन मिनिटांनी गॅस बंद करा.   

English
हिंदी सारांश
Web Title : Unique green paneer recipe: Delicious, easy, and quick to make.

Web Summary : Tired of regular paneer? Try this green paneer recipe! Fry spices, grind into a paste with coriander and cashew. Sauté onion, add paste, spices, paneer, cream, and simmer. Ready in minutes!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स