Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > तुम्ही जर ‘असा’ आलू मसाला खाल्ला पोटभर तर दिवसभर भूक लागणार नाही, खमंग नाश्ता

तुम्ही जर ‘असा’ आलू मसाला खाल्ला पोटभर तर दिवसभर भूक लागणार नाही, खमंग नाश्ता

try making aloo ke barule - very easy and tasty recipe, everyone will love it for sure : बटाट्याची भजी तर खाताच एकदा हा पदार्थही करुन पाहा. सोपा आणि चविष्ट .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2025 16:18 IST2025-11-24T16:16:00+5:302025-11-24T16:18:15+5:30

try making aloo ke barule - very easy and tasty recipe, everyone will love it for sure : बटाट्याची भजी तर खाताच एकदा हा पदार्थही करुन पाहा. सोपा आणि चविष्ट .

try making aloo ke barule - very easy and tasty recipe, everyone will love it for sure | तुम्ही जर ‘असा’ आलू मसाला खाल्ला पोटभर तर दिवसभर भूक लागणार नाही, खमंग नाश्ता

तुम्ही जर ‘असा’ आलू मसाला खाल्ला पोटभर तर दिवसभर भूक लागणार नाही, खमंग नाश्ता

बटाटा भजी आवडते ? मग हा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडेल. या पद्धतीने बटाट्याची भजी कधी खाल्ली नसेल. फार चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आहे. याला आलू के बरुले असे म्हटले जाते. (try making aloo ke barule - very easy and tasty recipe, everyone will love it for sure  )यूपी- बिहार सारख्या ठिकाणी हा पदार्थ घरोघरी केला जातो. मस्त कुरकुरीत असतो. लहान मुलांना तर नक्कीच आवडेल. पाहा काय करायचे. 

साहित्य 
दम आलू (लहान बटाटे), काश्मीरी लाल मिरची, पाणी, लसूण, कॉर्नफ्लावर, मैदा, बेसन, तेल, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, चिंच, लाल तिखट, धणे - जिरे मसाला, मीठ, कांदा

कृती
१. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. आल्याचे काही तुकडे घ्यायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. छान ताजी कोथिंबीर निवडायची आणि स्वच्छ धुवायची. चिंच कोमट पाण्यात भिजवायची. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, चिंचेचे पाणी(गाळलेले), चमचाभर धणे - जिरे पूड, चमचाभर लाल तिखट थोडं मीठ आणि थोडं पाणी घालून मिक्सरमधून चटणी वाटून घ्यायची.  

२. एका कुकरच्या भांड्यात पाणी घ्यायचे. त्यात मीठ घालायचे. तसेच बटाटे घालायचे आणि उकडून घ्यायचे. अगदीच जास्त उकडू नका. जरा मध्यम उकडा. उकडून झाल्यावर गार करायचे आणि त्याचे दोन तुकडे करायचे. जर दम आलू नसतील तर साध्या बटाट्याचे जास्त तुकडे करायचे. तुकडा मोठाच ठेवायचा. सालं काढू नका. 

३. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली काश्मीरी लाल मिरची घ्यायची. त्यात लसणाच्या काही पाकळ्या टाकायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे, आलं घालायचं. घट्ट पेस्ट वाटायची. एका परातीत बटाट्याचे तुकडे घ्यायचे. त्यात कॉर्नफ्लावर, तयार केलेली लाल मिरचीची चटणी, मीठ, थोडं बेसन, थोडा मैदा घालायचा आणि कालवून घ्यायचे. बटाटा कुस्करायचा  नाही. तुकडेच ठेवायचे. 

४. कढईत तेल गरम करायचे. त्यात बटाट्याचे मसाला लावलेले तुकडे सोडायचे आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. छान खमंग तळून घ्यायचे. कांदा सोलायचा आणि कांद्याचे गोल काप करायचे. तयार केलेली भजी घ्यायची त्यावर चटणी घालायची आणि कांदाही घालायचा. 

Web Title : स्वादिष्ट आलू मसाला रेसिपी: पेट भर, दिन भर भूख नहीं!

Web Summary : यह आसान और स्वादिष्ट 'आलू के बरूले' रेसिपी का आनंद लें, जो एक लोकप्रिय उत्तर भारतीय नाश्ता है। आलू उबाले जाते हैं, मसालेदार घोल में लेपित किए जाते हैं, और कुरकुरे होने तक तले जाते हैं। चटनी और प्याज के साथ परोसने पर, यह एक स्वादिष्ट व्यंजन है जो सभी को, विशेषकर बच्चों को पसंद आता है।

Web Title : Delicious Aloo Masala Recipe: Full Stomach, No Hunger All Day!

Web Summary : Enjoy this easy and tasty 'Aloo ke Barule' recipe, a popular North Indian snack. Potatoes are boiled, coated in a spicy batter, and fried until crispy. Served with chutney and onions, it's a flavorful treat loved by all, especially kids.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.