Join us
Daily Top 2Weekly Top 5

Traditional summer recipe : टेस्टचा धमाका आंबट गोड तिखट चिंच आल्याची चटणी, उन्हाळा स्पेशल तोंडीलावणे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2026 14:34 IST

Traditional summer recipe: A taste explosion of sour, sweet, spicy tamarind ginger chutney, a summer special mouth-watering treat : आल्याची चविष्ट चटणी करण्याची रेसिपी.

उन्हाळ्यात उष्णतेमुळे भूक कमी लागणे, अपचन होणे किंवा पोट फुगणे अशा तक्रारी अनेकांना जाणवतात. अशा वेळी जेवणासोबत थोडी आल्याची चटणी खाल्ली तर ती आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि भूक वाढण्यास मदत होते. (Traditional summer recipe: A taste explosion of sour, sweet, spicy tamarind ginger chutney, a summer special mouth-watering treat..)आल्यामध्ये पचन सुधारण्याचे नैसर्गिक गुण असतात. त्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. जड किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतरही आल्याची चटणी पोट हलकं ठेवण्यास उपयोगी ठरते.

याशिवाय आल्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असल्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. मळमळ किंवा उलट्या होण्याची भावना कमी करण्यासाठीही आलं उपयुक्त मानलं जातं. त्यामुळे उन्हाळ्यात जेवणासोबत थोड्या प्रमाणात आल्याची चटणी खाल्ली तर चव वाढते आणि आरोग्यालाही फायदा होतो. तसेच ही चटणी आल्याची असली तरी चवीला उग्र लागत नाही. त्यात चिंचही असते. त्यामुळे पोटाला आराम मिळतो. पाहा सोपी रेसिपी.  

साहित्य आलं, गूळ, लाल तिखट, मीठ, चिंच, हळद, जिरे पूड, चाट मसाला, पाणी

कृती१. एक आलं अख्ख सोलून घ्या. स्वच्छ धुवा. छान किसून घ्यायचे, थोड पिळून घ्या. जास्त नाही अगदी जास्तीचा जो रस आहे तेवढाच बाजूला करा. चिंच गरम पाण्यात भिजवा. किमान वीस मिनिटे तरी पाण्यातच ठेवा. नंतर हाताने कुस्करा आणि बिया काढून टाका. रस गाळ्यात घ्या गाळून घ्या. व्यवस्थित हाताने मळून रस काढा. चोथा बाजूला करा. 

२. गूळ बारीक चिरुन घ्या. किसून घेतला तर आणखी उत्तम. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात किसलेले आले तसेच चिंचेचा कोळ घ्यायचा. त्यात गूळ घालायचा. चवीनुसार मीठ घाला आणि नंतर हळदही घाला. चाट मसाला घाला. लाल तिखट घाला थोडं पाणी घाला आणि वाटून घ्या. मस्त घट्ट चटणी तयार करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Tangy Tamarind-Ginger Chutney: A Summer Cooler and Digestive Aid

Web Summary : Ginger chutney aids digestion, reduces bloating, and boosts appetite during summer. Its antioxidants fight inflammation and ease nausea. This recipe combines ginger and tamarind, offering a flavorful and healthful addition to meals, without being too strong. It's easy to prepare and beneficial for health.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससमर स्पेशल