Join us

Traditional recipes of maharashtra : चिंचेचे सार प्या, मारा भुरका! १० मिनिटांत करा पारंपरिक चिंचेचं सार, तोंडाला येईल चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2025 18:27 IST

Traditional recipes of Maharashtra: tamarind recipes,Make traditional chincha saar in 10 minutes : चिंचेचे सार करायची सोपी रेसिपी.

चिंचेचे सार हे पारंपरिक भारतीय पेयांपैकी एक लोकप्रिय आणि चविष्ट पेय आहे. याची आंबट-गोड चव जिभेला सुखावणारी असते आणि गरम हवामानात ते शरीराला ताजेतवाने करते. चिंचेत जीवनसत्व सी, लोह, मॅग्नेशियम आणि अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे पचन सुधारतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. (Traditional recipes of Maharashtra:  tamarind recipes,Make traditional chincha saar in 10 minutes)हे सार थकवा दूर करुन उर्जा वाढवतात आणि उष्णतेपासून संरक्षण देते. चिंचेचे सार रोगप्रतिकारशक्ती वाढवून आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. तसेच करायला अगदी सोपे असते. ही रेसिपी एकदा नक्कीच करुन पाहा. 

साहित्य चिंच, गूळ, लसूण, कडीपत्ता, मोहरी, मीठ, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, जिरे, पाणी, कोथिंबीर, तेल

कृती१. चिंचेचा कोळ तयार करायचा. त्यासाठी चिंच पाण्यात भिजवायची. तासभर तरी भिजत ठेवायची. नंतर हाताने कुस्करायची. चिंच व्यवस्थित कुस्करुन घ्या. कुस्करल्यावर त्यातील बिया आणि चोथा काढून घ्या. गाळून घ्यायचे. 

२. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात थोडी मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यावर त्यात थोडे जिरे घालायचे जिरे मस्त फुलू द्यायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. सोलून झाल्यावर लसूण ठेचायची किंवा त्याचे तुकडे करायचे. सलूणही फोडणीत घाला. मस्त परता त्यात कडीपत्याची पाने घाला. त्यात हिरव्या मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे घाला आणि मस्त परता. 

३. फोडणीत हळद घाला. तसेच त्यात लाल तिखट घाला आणि मग परतून घ्यायचे. कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची आणि निवडायची. मस्त बारीक चिरायची. त्यात कोथिंबीर घाला आणि परता. सगळ्यात शेवटी चिंचेचे पाणी घालायचे. त्याला उकळी आल्यावर त्यात थोडे पाणी घाला. नंतर मीठ घाला आणि छान उकळू द्या. 

४. गूळ चिरायचा. किंवा मग किसून घ्यायचा. सारात थोडा गूळ घालायचा आणि उकळायचा. मस्त उकळू द्या. गूळ पूर्ण विरघळू द्यायचा. एक वाफ काढा आणि मग त्यात गरज असेल तर थोडे पाणी घाला.  चिंचेचे सार भातावर घ्यायचे फार मस्त लागते.  तसेच आवडत  असेल तर फोडणीत कांदा घालू शकता. तसेच लाल मिरचीही घालू शकता.  

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtrian Tamarind Saar: A 10-Minute Traditional Recipe for Refreshment

Web Summary : Tamarind Saar, a traditional Maharashtrian drink, offers a tangy-sweet taste and health benefits. Rich in vitamins and antioxidants, it aids digestion, boosts immunity, and provides energy. This simple recipe involves tamarind pulp, spices, and jaggery for a quick, refreshing beverage.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स