Join us

भरड्याचे वडे करण्याची पारंपरिक कृती, वडे इतके कुरकुरीत की खातच राहावे! पाहा परफेक्ट प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2025 11:57 IST

Traditional recipe for making Bhardyache vade, so crispy that you will love eating, See the perfect recipe : पारंपरिक भरड्याचे वडे करायचे योग्य प्रमाण. पाहा कसे पीठ करायचे. एकदम सोपी रेसिपी.

वडे  हा प्रकार महाराष्ट्रात फास लोकप्रिय आहे. मग फक्त बटाटा वडेच नाही, तर इतरही विविध प्रकारचे वडे असतात. बटाटा वडा तर गल्लोगल्ली मिळतोच. मात्र बाकी प्रकारही एकदम मस्त असतात. (Traditional recipe for making Bhardyache vade, so crispy that you will love eating,  See the perfect recipe )जसे की भाजणीचे वडे केले जातात. एकदम मस्त पदार्थ आहे, खमंग आणि कुरकुरीत असतात. साबुदाणा वडा तर उपासाच्या दिवशी राजाच असतो. या वड्याचा आस्वाद घेण्यासाठी खास उपास करणारे लोकही आहेत. आणखी एक वड्याचा प्रकार म्हणजे भरड्याचे वडे. श्राद्धासाठी हे वडे केले जातात. तसेच देवीला नैवेद्य म्हणूनही केले जातात. काही ठिकाणी फक्त नाश्त्यासाठीही केले जातात. चवीला छान असतात. या वड्यांसाठी पदार्थांचे प्रमाण पाहा.     

साहित्य (प्रमाणासकट)

एक किलो तांदूळएक वाटी चणाडाळएक वाटी अख्खे उडीदएक चमचा मेथीअर्धी वाटी जिरं

कृती१. तांदूळ छान स्वच्छ धुवायचे. धुतल्यावर तांदूळ वाळवायचे. कोरड्या कापडावर वाळत घालायचे. पंख्याखाली वाळवायचे. पूर्ण सुकले की मग एका खोलगट डब्यात भरुन ठेवायचे. एक किलो तांदूळ घेतल्यावर त्याच्या प्रमाणात इतर पदार्थ घ्यायचे. वरील प्रमाणात सांगितल्यानुसारच पदार्थ घ्या.  

२. तांदूळ फक्त धुवायचे. डाळ तशीच कोरडी घ्यायची. उडीदही धुवायचे नाहीत. वाटीभर चणाडाळ  घ्यायची. तसेच वाटीभर अख्खे उडीद घ्यायचे. चमचाभर मेथीचे दाणे घ्यायचे. तसेच अर्धी वाटी जिरं घ्यायचं. सागळे पदार्थ एकत्र करायचे. त्याचे सरसरीत पीठ दळून आणायचे. सारे पदार्थ कच्चेच दळायचे. परतायचे किंवा भाजायचे नाहीत. 

चार वाटी पिठाचे वडे करताना त्यासाठी पुढील प्रमाणे इतर पदार्थ घ्या. वडे करण्यासाठी दोन चमचे तेल पिठात घालायचे. मोहन नाही कच्चे तेलच घालायचे. गरम घालायची गरज नाही. चवीनुसार मीठ घालायचे. तसेच दोन ते तीन चमचे वाटलेली हिरवी मिरची घालायची. ताजी मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. चमचाभर हळद घालायची. दोन वाटी कोमट पाणी घालायचे. बाकी पीठ मळताना साधे पाणी वापरुन चालते. पीठ मळून झाल्यावर गरमागरम तेलात भोकाचे थापलेले वडे तळायचे. सोबत दही मिरची घ्यायची. मस्त लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स