ओल्या काजूंची भाजी फार लोकप्रिय आहे. मात्र हे काजू काही ठराविक दिवसातच मिळतात. इतर वेळी जर तुम्हाला काजूची भाजी खायची इच्छा होत असेल तर या पद्धतीने मसाला काजू करुन पाहा. अगदी सोपी रेसिपी आहे तसेच चवीला एकदम जबरदस्त लागते. (Traditional recipe for cashew curry, make a delicious recipe anytime you want )पाहा भाजी कशी करायची. काही मिनिटांत होते आणि भात तसेच पोळी, भाकरी साऱ्यासोबत छान लागते.
साहित्य 
काजू, कांदा, कोथिंबीर, पाणी, तूप, तेल, जिरे, तमालपत्र, लसूण, आलं, लाल तिखट, हळद, टोमॅटो, मीठ, साय, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, कसुरी मेथी, वेलची, काळीमिरी, पाणी
कृती
१. एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यात लांब चिरलेला कांदा आणि काजू घाला. थोडे मीठ घाला आणि उकळवून घ्या. कांदा व्यवस्थित उकळा. नंतर काजू आणि कांद्याची पेस्ट तयार करुन घ्या. पेस्ट करताना जास्त पाणी घालू नका. कांदा आणि काजू ओले असल्याने मस्त पेस्ट तयार होते. 
२. एका खोलगट पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यावर काजूचे तुकडे परतायचे. रंग बदलेपर्यंत खमंग परतायचे. परतून झाल्यावर ताटात काढून ठेवायचे. कांदा बारीक चिरायचा. टोमॅटो बारीक चिरायचा. कोथिंबीरही बारीक चिरुन घ्यायची. लसणाच्या पाकळ्या सोलायच्या , आल्याचा तुकडा घ्यायचा. आले - लसूण पेस्ट तयार करायची.
३. कढई चमचाभर तूप घ्या. त्यावर जिरं परता. तसेच काळीमिरी घाला. तसेच तमालपत्र घाला. वेलचीही परतून घ्यायची. त्यात आले - लसूण पेस्ट घालायची. बारीक चिरलेला कांदा परतायचा. टोमॅटो परतायचा. त्यात थोडे पाणी घालायचे. तसेच तयार केलेली कांद्याची पेस्ट घालायची. झाकण ठेवा आणि एक वाफ काढून घ्यायची.
४. त्यात चमचाभर हळद घाला. दोन चमचे लाल तिखट घाला. तसेच गरम मसाला घाला आणि ढवळून घ्यायचे. त्यात काजू घाला. ढवळा आणि शिजवून घ्या. कसुरी मेथी घाला आणि एक वाफ काढा. त्यात थोडी साय घाला गरमागरम भाजी खा.
