'दही' हा आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. आपल्याकडे दही आणि दह्याचे अनेक पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ले जातात. अनेक घरांमध्ये दही शक्यतो रोज लागत असल्याने घरीच तयार केले जाते. परंत घरच्याघरीच दही तयार करायचे म्हटलं तर अनेक गृहिणींची तक्रार असते की, दही पातळ, आंबट होत चव बिघडते किंवा विकतसारखे घट्टसर होत नाही. यासाठी, विकतसारखेच घट्ट व दाटसर दही घरीच तयार करण्यासाठी आपण खास राजस्थानच्या गावात आजही ज्या पारंपरिक पद्धतीचा वापर केला जातो ती सोपी पद्धत पाहूयात..(traditional Rajasthani curd making method).
आजही राजस्थानच्या अनेक गावांमध्ये घराघरात अस्सल पारंपरिक पद्धतीने घट्ट, दाटसर आणि ताजं दही लावलं जातं. बाजारात मिळणारं दही जरी विकत आणलं तरी घरगुती पद्धतीने लावलेल्या दह्याची चव, गोडवा आणि टेक्श्चर वेगळंच असतं. राजस्थानच्या ( how to make tasty curd like Rajasthani style) गावांमध्ये आजही वापरली जाणारी ही दही लावण्याची भन्नाट ट्रिक, आणि तिची सोपी पद्धत पाहा...
घट्ट व दाटसर दही करण्याची साधीसोपी भन्नाट ट्रिक...
राजस्थानातील कित्येक घराघरांत आजही घट्ट, दाटसर आणि एकदम परफेक्ट असे कवडी दही लावले जाते. यामागे कोणतीही महागडी वस्तू नाही, तर एक जुनी, पारंपारिक आणि अत्यंत सोपी 'देसी ट्रिक' आहे. राजस्थानच्या गावांमध्ये आजही ही पद्धत वापरली जाते, ज्यामुळे त्यांचे दही इतके घट्ट जमते की आपण ते चाकूने देखील कापू शकता. चमचा उलटा केला तरी खाली न पडणारे, एकदम बाजारातल्या दह्यासारखे घट्ट व दाटसर दही घरीच तयार करायचे असेल तर मातीच्या भांड्याचा वापर करा. राजस्थानमध्ये, विशेषतः थंडीच्या दिवसांत किंवा अगदी कडक उन्हाळ्यातही, दही घट्ट आणि दाटसर करण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर केला जातो. मातीच्या भांड्यात दही लावल्यास ते अधिक घट्ट आणि चविष्ट होते.
बेसन नको, कपभर पोह्याचा करा पांढराशुभ्र ढोकळा! कधीही खा पोटभर, पचायला हलका आणि करायला सोपा...
दही नेमकं कसं लावावं ?
१. दही घट्ट होण्यासाठी गाईच्या दुधाऐवजी म्हशीचं दूध वापरणं सर्वोत्तम ठरतं. म्हशीच्या दुधात फॅट जास्त असल्याने दही जास्त घट्ट लागतं.
२. दूध मंद आचेवर चांगलं उकळा आणि मग ते कोमट (जास्त गरम नाही, हातावर सहन होईल इतकं) होईपर्यंत थंड होऊ द्या.
३. राजस्थानच्या गावात दही नेहमी मातीच्या माठात लावलं जातं. त्यामुळे त्यातली ओलसरता नीट शोषली जाते आणि दही दाटसर होतं.
४. थोडं जुनं, आंबटपणा असलेलं दही विरजण म्हणून वापरल्यास नवीन दही पटकन लागते आणि घट्ट व दाटसर होते.
५. कोमट दुधात १ ते २ चमचे जुन्या दह्याचे विरजण घाला आणि हलक्या हाताने नीट मिसळा.
६. भांडे झाकून घरातील उबदार ठिकाणी ७ ते ८ तास ठेवा. राजस्थानात हे भांडे चुलीच्या जवळ किंवा गरम पाण्याने भिजवलेल्या ओल्या कापडाखाली ठेवतात, ज्यामुळे तापमान टिकून राहतं.
७. दही घट्ट झालं की ते फ्रिजमध्ये ठेवा. त्यामुळे ते अजून घट्ट आणि मलईदार होतं.
८. दही लावताना दूधात अर्धा चमचा साखर आणि थोडीशी दुधाची साय मिसळल्यास दही अधिक क्रिमी, मऊ आणि दाट होत.
अशाप्रकारे ही साधी पण पारंपरिक पद्धत वापरली की घरगुती दही होईल अगदी अस्सल राजस्थानी स्टाईल घट्ट, मलईदार आणि चविष्ट...