वेगवेगळ्या प्रकारच्या आमटी तुम्ही नक्कीच करत असाल. एकदा ही चविष्ट अशी शिपी आमटी नक्की करुन पाहा. महाराष्ट्रात ही आमटी विविध नावाने ओळखली जाते. करायला अगदी सोपी आहे. एकदम झणझणीत होते. पाहा कशी करायची.
साहित्य चणाडाळ, मूगडाळ, तूरडाळ, मसूरडाळ, उडीद डाळ, तेल, मीठ, दालचिनी, चक्रीफूल, हळद, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, लसूण, सुकं खोबरं, आलं, कडीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, जिरे, लाल तिखट, धणे - जिरे पूड, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, पाणी
कृती१. एका वाडग्यात दोन चमचे चणाडाळ घ्यायची. त्यात त्यात प्रमाणात मूगडाळ घालायची. तसेच तूरडाळही घालायची. मसूरडाळ आणि उडीद डाळही घालायची. पाण्याने डाळी मस्त स्वच्छ धुवायच्या. पाच मिनिटे भिजत ठेवायच्या. नंतर एका तव्यावर डाळी भाजून घ्यायच्या. छान खमंग भाजा. भाजून झाल्यावर एका कुकरमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यावर भाजलेल्या डाळी जरा परतायच्या नंतर त्यात पाणी आणि मीठ घालायचे. चक्रीफूल आणि दालचिनी घाला, थोडी हळद घालून कुकर लावायचा. डाळी छान शिजवून घ्यायच्या. एका मिक्सरच्या भांड्यात शिजलेल्या डाळी घ्यायच्या आणि त्याची पेस्ट तयार करायची. डाळ शिजवताना पाणी कमी ठेवायचे.
२. पॅन किंवा कढईत तेल घेऊन त्यावर हिरव्या मिरचीचे तुकडे परतून घ्यायचे. तसेच लसणाच्या काही पाकळ्याही परतायच्या. थोडं सुकं खोबरं परतायचं. कांदाही छान परतून घ्यायचा. टोमॅटोही परतून घ्यायचे. सगळे पदार्थ छान परतायचे. कोथिंबीरही परतायची. सुकं खोबरंही परतून घ्या, नंतर ते वाटून घ्यायचे. (Traditional method of making sparkling shipi amti - color, taste, recipe are all amazing, eat with rice and ghee)छान पेस्ट तयार करायची.
३. एका कढईत किंवा खोलगट पातेल्यात थोडे तेल घ्यायचे. तेल तापल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे घालायचे. तसेच कडीपत्ता घालायचा. छान परतायचे मग त्यात तयार केलेला वाटण घालायचे. त्याला तेल सुटायला लागले की पाणी घालायचे. चमचाभर लाल तिखट, चवीपुरते मीठ, धणे- जिरे पूड, गरम मसाला, कांदा- लसूण मसाला घालून ढवळायचे. मस्त उकळवायचे. त्यात शिजवलेल्या डाळीचे वाटण घालायचे. आमटी उकळायची. गरमागरम भातासोबत खायची.
Web Summary : Make flavorful Shipi Amti easily with mixed lentils and spices. Roast lentils, cook with spices, blend, and then simmer with sautéed aromatics and spice powders. Enjoy hot with rice.
Web Summary : मिश्रित दालों और मसालों के साथ आसानी से स्वादिष्ट शिपी आमटी बनाएं। दालों को भूनें, मसालों के साथ पकाएं, ब्लेंड करें, फिर भुनी हुई सुगंधित सामग्री और मसाला पाउडर के साथ उबाल लें। चावल के साथ गरम परोसें।