उन्हाळ्याच्या दिवसांत रात्रीच्या जेवणात खूप काही हेवी खाण्याची इच्छा नसते. अशातच त्याच त्या चवीचं आपलं नेहमीचं जेवण करण्यातही मजा येत नाही. काहीतरी वेगळं करून खावंसं वाटतं. म्हणूनच अशावेळी करण्यासाठी उकड शेंगोळे हा एक मस्त चमचमीत पदार्थ आहे. अगदी पौष्टिक, खमंग असणारे शेंगोळे खवय्यांची रसना तृप्ती नक्कीच करतात. रेसिपी थोडीशी वेळखाऊ आहे (typical marathi dish ukad shengule recipe). पण तो पदार्थच एवढा छान होतो की मग थोडा वेळ त्यात जास्त गेला तरी सहज जमून जाते (how to make ukad shengule?). हल्ली रात्रीच्या जेवणात अनेकांना वन डिश मील हवे असते. अशा लोकांसाठीही हा पदार्थ अगदी उत्तम आहे.(traditional Maharashtrian recipe of ukad shengule)
उकड शेंगोळे करण्याची रेसिपी
साहित्य
१ कप ज्वारीचे पीठ
१ कप हरबरा डाळीचे पीठ
३ कप गव्हाचे पीठ
४ ते ५ हिरव्या मिरच्या
१० ते १२ लसूण पाकळ्या
लॅपटॉप-कम्प्युटरवर काम करून मान- पाठ आखडली? ३ सोपे उपाय-अंग होईल मोकळं
२ टीस्पून जिरे
१ टीस्पून किसलेले आले
चवीनुसार मीठ
अर्धा कप शेंगदाण्याचा कूट
१ टीस्पून हळद
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग
अर्ध्या लिंबाचा रस
कृती
सगळ्यात आधी तर एका भांड्यात ज्वारीचे पीठ, बेसन आणि कणिक एकत्र करून घ्या. त्यामध्ये थोडं मीठ, ओवा, लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड घाला आणि पीठ थोडं घट्ट मळून घ्या. यावर झाकण ठेवून १५ ते २० मिनिटे पीठ भिजू द्या.
उकडत असल्याने स्वयंपाक करणंही नकोसं होतं? डिनरसाठी करा झटपट होणारे ६ पदार्थ- वेळ वाचेल
आता लसूण पाकळ्या, मिरच्या, आलं, जिरे, कोथिंबीर असं सगळं मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात थोडं लिंबू पिळा आणि मिक्सरमध्ये फिरवून त्याचं अगदी बारीक वाटण करून घ्या.
आता पीठ व्यवस्थित भिजवून झाले असेल तर हाताला तेल लावून पिठाचे छोटे छोटे गोळे करा आणि त्याला तुम्हाला पाहिजे तसा आकार द्या.
यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर तेल, मोहरी, हिंग घालून फोडणी करून घ्या. यामध्ये आता मिक्सरमधून फिरवलेले वाटण घालून चांगले तेल सुटेपर्यंत खमंग परतून घ्या. त्यानंतर त्यात दाण्याचा कूट आणि गरम पाणी घाला.
'या' पद्धतीने वापरून पाहा कॅस्टर ऑईल, पाेटाचे त्रास कमी होऊन सौंदर्यही खुलेल
आता कढईतल्या पाण्याला उकळी आली की त्यात मीठ घाला आणि तयार केलेले शेंगोळे एकेक करून सोडा. एकदम सगळे शेंगोळे कढईत घालू नका. नाहीतर त्याचा गचका होतो. आता कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. गरमागरम उकड शेंगोळे झाले तयार.