नाश्त्याला रोज काय करावं, हा प्रश्न बहुसंख्य महिलांना रोजच छळतो. त्यात पुन्हा घरातल्या मंडळींना असा पदार्थ हवा असतो जो चवीलाही थोडा वेगळा असेल.. आता तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे बच्चे कंपनीही घरीच आहे. त्यांनाही संध्याकाळच्या वेळी थोडीशी भूक लागतच असते. अशा वेळी त्यांना देण्यासाठी उकडपेंडी हा पदार्थ अतिशय उत्तम ठरू शकतो. तुम्ही तो नाश्त्यालाही खाऊ शकता तसेच मुलांना डब्यात देण्यासाठीही उकडपेंडी चांगली आहे. कारण ती थोडी जरी खाल्ली तरी पुढे बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे पोटासाठी ती अतिशय दमदार ठरते (ukadpendi recipe in Marathi). शिवाय त्यासाठी आपण ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ वापरत असल्यामुळे ती पौष्टिकही आहेच (traditional maharashtrian food). जे लोक वेटलॉस करत आहेत, ते नुसत्या ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी करून खाऊ शकतात.(how to make vidarbh special ukadpendi?)
विदर्भस्पेशल उकडपेंडी करण्याची रेसिपी
साहित्य
२ टेबलस्पून तेल
१ कप ज्वारीचं पीठ
१ कप गव्हाचं पीठ
१ मध्यम आकाराचा कांदा
वाळून गेलेल्या रोपालाही फुटेल नवी पालवी! घरीच करा 'हे' खत- फक्त ५ दिवसांतच दिसेल फरक
१ मध्यम आकाराचा टोमॅटो
कडिपत्त्याची ८ ते १० पाने
३- ४ हिरव्या मिरच्यांचे बारीक काप
१ टेबलस्पून शेंगदाणे
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ वाटी दही
कृती
सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि तिच्यामध्ये तेल घालून फोडणी करून घ्या.
फोडणी करून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून हलकासा परतून घ्या. कांदा खूप परतू नये कारण पुन्हा पीठ भाजत असताना कांदा जळू शकतो.
पायाचे घोटे काळवंडून खूपच घाण दिसू लागले? ३ उपाय- ५ मिनिटांत घोटे होतील स्वच्छ
आता कांदा परतून झाल्यानंतर त्यात मिरच्यांचे तुकडे, शेंगदाणे घालावे आणि ते ही हलके परतून घ्यावे. यानंतर दोन्ही पीठं कढईमध्ये घाला आणि मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्या.
जेव्हा पिठाचा रंग थोडा बदलेल आणि ते रवाळ होईल तेव्हा त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ, हळद आणि लाल तिखट घालावे.
एक्सपर्ट सांगतात- महिलांनो फक्त ३ गोष्टी करा, महिनाभरात वजन उतरून 'फॅट'च्या 'फिट' व्हाल..
यानंतर दही आणि अडीच ते तीन वाट्या पाणी घाला आणि पीठ व्यवस्थित हलवून घ्या. एकदम पाणी घालू नये कारण तसे केल्यास पिठात गाठी होतात.
यानंतर कढईवर झाकण ठेवून ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर वाफ येऊ द्या. त्यानंतर कोथिंबीर घालून गरमागरम उकडपेंडी खाण्याचा आनंद घ्या..