Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > थंडीत प्यायलाच हवं पारंपरिक मुगाचं कढण, नव्या बेचव वेटलॉस रेसिपी विसरा-प्या आजीचं वेटलॉस ड्रिंक

थंडीत प्यायलाच हवं पारंपरिक मुगाचं कढण, नव्या बेचव वेटलॉस रेसिपी विसरा-प्या आजीचं वेटलॉस ड्रिंक

Traditional drink for cold weather - drink this weight loss drink, best food : नक्की प्या मुगाचे कढण. आरोग्यासाठी फायद्याचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2026 16:28 IST2026-01-09T16:24:25+5:302026-01-09T16:28:07+5:30

Traditional drink for cold weather - drink this weight loss drink, best food : नक्की प्या मुगाचे कढण. आरोग्यासाठी फायद्याचे.

Traditional drink for cold weather - drink this weight loss drink, best food | थंडीत प्यायलाच हवं पारंपरिक मुगाचं कढण, नव्या बेचव वेटलॉस रेसिपी विसरा-प्या आजीचं वेटलॉस ड्रिंक

थंडीत प्यायलाच हवं पारंपरिक मुगाचं कढण, नव्या बेचव वेटलॉस रेसिपी विसरा-प्या आजीचं वेटलॉस ड्रिंक

असे अनेक पारंपरिक पदार्थ आहेत जे आजकाल कमी केले जातात. मात्र ते फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठी फार चांगले आणि करायलाही अगदी सोपे असतात. त्यापैकीच एक म्हणजे कढण. डाळी, कडधान्ये यांच्या पाण्याचे केलेले कढण भातावर घ्यायला आणि नुसते प्यायला केले जाते. (Traditional drink for cold weather - drink this weight loss drink, best food)मराठी स्वयंपाकात कढण हा एक अतिशय पारंपरिक, हलका आणि औषधी गुणधर्म असलेला पदार्थ मानला जातो. विशेषतः मुगाचे कढण हे आजारी व्यक्तींसाठी, उपवासानंतर किंवा पचन बिघडलेले असताना देण्यासाठी केले जाते. 

कढण म्हणजे काय, हे आधी समजून घेणे महत्त्वाचे आहे. कढण हा पातळ, उकळवलेला पदार्थ असतो. डाळ, कडधान्य किंवा कधी कधी भाज्या उकळवल्यावर त्याचे जे पाणी निघते ते पाणी उकळून त्यात थोडे मीठ, जिरे, आलं किंवा मिरची घालून हा प्रकार तयार केला जातो. मसाला फोडणी काहीही करायची गरज नाही. त्यामुळे कढण सहज पचते. पूर्वी आजारपणात, तापानंतर किंवा उपासानंतर शरीराला शक्ती देण्यासाठी कढण दिले जायचे.

मूगाचे कढण हे कढणाच्या प्रकारांमध्ये सर्वात पौष्टिक मानले जाते. मूग डाळ किंवा अख्खा मूग भिजवून उकडला जातो आणि त्यातील पाणी गाळून हे कढण तयार केले जाते. या पाण्यात मुगातील अनेक पोषणतत्त्वे उतरलेली असतात. मूगामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जी शरीराच्या पेशी दुरुस्त करण्यास आणि ताकद वाढवण्यास मदत करतात. मुगाचे कढण पातळ असल्यामुळे ही प्रथिने सौम्य स्वरुपात शरीराला मिळतात.

मूगाच्या कढणामध्ये फायबरही असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. बद्धकोष्ठता, जुलाब किंवा पोट बिघडले असताना मुगाचे कढण पोटाला त्रास न देता पोषण पुरवते. याशिवाय मुगामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी खनिजे असतात. ही खनिजे शरीरातील ताकद वाढवतात, स्नायूंना बळ देतात आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. एकूणच मुगाचे कढण हा साधा पण अत्यंत पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेला पदार्थ आहे. तेल-मसाले न वापरता तयार होत असल्यामुळे तो पचनासाठी हलका, आरोग्यासाठी लाभदायक आणि सर्व वयोगटांसाठी योग्य ठरतो. रोजच्या आहारात अधूनमधून मुगाचे कढण घेतल्यास पोटाचे आरोग्य चांगले राहते आणि शरीराला नैसर्गिक पद्धतीने पोषण मिळते.

Web Title : सर्दियों में पारंपरिक मूंग का सूप अपनाएं; वेट-लॉस रेसिपी भूल जाएं।

Web Summary : आधुनिक आहार को छोड़ें और पारंपरिक, स्वस्थ मूंग का सूप (कढ़न) अपनाएं। प्रोटीन और फाइबर से भरपूर, यह आसानी से पचने वाला पेय पाचन में मदद करता है, रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाता है और आवश्यक पोषक तत्व प्रदान करता है। सभी उम्र के लिए एकदम सही, हल्का और पौष्टिक उपाय, खासकर सर्दियों के दौरान।

Web Title : Embrace traditional moong soup in winter; forget weight-loss recipes.

Web Summary : Ditch modern diet fads for a traditional, healthy moong soup (kadhan). This easy-to-digest drink, rich in protein and fiber, aids digestion, boosts immunity, and provides essential nutrients. A perfect, light, and nourishing remedy for all ages, especially during colder months.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.