Join us
Daily Top 2Weekly Top 5

अहाहा! कोकणातील पारंपरिक काळ्या चण्याची आमटी, भातावर तूपाची धार आणि आमटीचा एक घास..पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2025 17:01 IST

Traditional black gram amti from Konkan, a drizzle of ghee on rice and a bite of amtibhat..see the recipe : काळ्या चण्याची आमटी करणे अगदी सोपे. पाहा काय करायचे.

भात हा आपल्या रोजच्या आहाराचा घटक आहे. त्यामुळे भातासोबत घ्यायला नेहमी काहीतरी वेगळे केले की जेवणाची रंगत वाढते. वेगवेगळ्या प्रकारच्या रस्सा भाजी तसेच आमटी, वरण आपण करत असतो. (Traditional black gram amti from Konkan, a drizzle of ghee on rice and a bite of amtibhat..see the recipe)त्यामुळे विविध प्रकारच्या आमटी आपण करत असतो. एकदा काळ्या चण्याची अशी आमटी करुन पाहा. पुन्हा नक्की कराल. एकदम झणझणीत लागते. तसेच करायला अगदी सोपी आहे. पाहा काय करायचे.  

साहित्य काळे चणे, पाणी, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची, हळद, मीठ, लाल तिखट, जिरे, तेल, कडीपत्ता, गरम मसाला, आलं

कृती१. काळे चणे रात्रभर भिजवून ठेवायचे. कुकरमध्ये चणे घ्यायचे. त्यात चमचाभर हळद घालायची. तसेच थोडे मीठ घालायचे. पाणी घालायचे आणि कुकर लावायचा. चणे छान शिजवून घ्यायचे. 

२. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. आल्याचा तुकडा घ्यायचा. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. सारे पदार्थ एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि त्यात जिरेही घालायचे. वाटून त्याची पेस्ट तयार करायची. 

३. एका कढईत चमचाभर तेल घ्यायचे. त्याच चमचाभर जिरे घालायचे. त्यात कडीपत्याची पाने घालायची आणि परतून घ्यायची. नंतर त्यात तयार केलेली हिरवी पेस्ट घालायची. परतून घ्यायची.छान खमंग परतून घ्यायची. छान परतून घेतल्यावर त्यात थोडा गरम मसाला घालायचा. तसेच लाल तिखट घालायचे. चमचाभर हळद घालायची. ढवळायचे आणि परतून घ्यायचे. 

४. कुकर उघडल्यावर चणे काढून घ्यायचे. त्यातील अर्धे चणे मिक्सरमधून वाटून घ्यायचे. अर्धे अख्खेच ठेवायचे. तयार फोडणीत वाटून घेतलेले घालायचे आणि उकळी येऊ द्यायची. नंतर त्यात थोडे पाणी घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तसेच अख्खे ठेवलेले चणे घालायचे. मस्त उकळी काढायची.जरा आटू द्यायचे. चवीला एकदम मस्त लागते.     

English
हिंदी सारांश
Web Title : Konkan's Special Black Chickpea Curry Recipe: A Flavorful Delight!

Web Summary : Enhance your meal with Konkan's black chickpea curry. This easy recipe involves soaking chickpeas, creating a flavorful paste, and simmering with spices. Enjoy this zesty and simple dish with rice.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स