लिंबू पाणी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायलात तर वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच, लिंबू पचनासाठी खूप उपयुक्त ठरतो, ज्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. असं असूनही, कोणत्याही गोष्टीचं जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. हेल्थ एक्सपर्ट निखिल वत्स यांनी जास्त लिंबू पाणी पिणं आपल्या शरीरासाठी चांगलं का नाही हे सांगितलं आहे.
जास्त लिंबू पाणी पिण्याचे तोटे
लिंबू हे व्हिटॅमिन सीचा रीच सोर्स आहे. जर आपल्या शरीरात या पोषक तत्वाची पातळी वाढली तर त्याचा परिणाम अनेक महत्वाच्या अवयवांवर होतो, म्हणून बरेच डॉक्टर मर्यादित प्रमाणात पिण्याचा सल्ला देतात.
पोटदुखी
व्हिटॅमिन सी वाढल्याने पोटातील एसिडिक सिक्रीशन वाढण्याची भीती असते कारण त्यामुळे एसिडिटी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. ही समस्या इथेच संपत नाही, तर जास्त लिंबू पाणी प्यायल्याने उलट्या, जुलाब आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेक लोकांना गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्सचा त्रास असतो, त्यांनी लिंबू पाणी कमी प्यावं.
तोंड येणे
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि दात स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो, परंतु जर तुम्ही जास्त लिंबू पाणी प्यायलात तर त्यात असलेल्या सायट्रिक एसिडमुळे ओरल टिश्यूजना सूज येते, ज्यामुळे तोंडात फोड येतात. तोंड येतं.
कमकुवत दात
लिंबू पाणी पिताना स्ट्रॉ वापरण्याचा प्रयत्न करा, कारण यामुळे लिंबाच्या रसाचा तुमच्या दातांशी कमीत कमी संपर्क येतो. असे केल्याने दात कमकुवत होणार नाहीत. जर तुम्हाला लिंबू पाणी प्यायला आवडत असेल ते योग्य प्रमाणात प्या.