बऱ्याचदा असं होतं की रात्री पोळी, भाजी खाण्याचा कंटाळा आलेला असतो. असं काही तरी जेवायला पाहिजे असतं जे चवदार असेल, झटपट तयार होईल आणि त्यासाठी खूप काही वेगळी तयारी करत बसण्याची गरज पडणार नाही. शिवाय पचायला हलकंही हवं. अशावेळी सर्वसामान्य घरांमध्ये खिचडीचा नंबर सगळ्यात आधी लागतो. म्हणूनच आता रात्रीच्या जेवणासाठी खिचडीच्या ऐवजी हा एक मस्त वेगळा पर्याय घ्या. टोमॅटो राईस करून पाहा (simple and easy recipe of tomato rice). हा राईस करायला अगदी सोपा आहे (how to make tomato rice?). झटपट होतो आणि शिवाय चमचमीत असल्याने लहान मुलांपासून ते मोठ्या मंडळींपर्यंत सगळ्यांनाच आवडू शकतो (tomato rice recipe).
टोमॅटो राईस करण्याची रेसिपी
कृती
२ ते ३ मध्यम आकाराचे टोमॅटो
१ वाटी बासमती तांदूळ
उडपी हॉटेलमध्ये इडली- डोशासोबत मिळते तशा अस्सल साऊथ इंडियन चटणीची रेसिपी- एकदा करून पाहाच...
२ मध्यम आकाराचे कांदे आणि ८ ते १० लसूण पाकळ्या
१ इंच आल्याचा तुकडा आणि ३ ते ४ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी बटर, तेल, दालचिनी, तेजपान, मिरे, मोहरी आणि जिरे
चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी तर टोमॅटो, लसूण पाकळ्या, आल्याचा एक लहानसा तुकडा आणि लाल तिखट असे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्याची प्युरी करून घ्या. बासमती तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत घाला.
यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये बटर, तेल घालून मोहरीची फोडणी करून घ्या. यानंतर त्यामध्ये तेजपान, दालचिनी, मिरे, लवंग घालून परतून घ्या. त्यानंतर मिरचीचे बारीक तुकडे आणि उभे चिरलेले कांदे परतून घ्या.
यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी घाला. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की मग भिजवलेला तांदूळ घालून एखादा मिनिट परतून घ्या. यानंतर जेवढा तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी आणि मीठ घालून तांदूळ शिजवून घ्या. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की चमचमीत टोमॅटो राईस तयार.
