Join us

फक्त ४ टोमॅटो वापरून करा १०० पेक्षा जास्त कुरकुरीत पापड; ही घ्या इंस्टंट पापड रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 11:49 IST

Tomato Papad Recipe : मिक्सरमध्ये साबुदाणे बारीक करून घ्या. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात साबुदाण्यांची पावडर, लाल तिखट, टोमॅटोची पेस्ट घाला. 

हिवाळा संपत आला घरोघरी पापड, कुरडया, सांडगे बनवण्याची तयारी सुरू होते. बऱ्याच इमारतींच्या छतावर आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे पापड सुकवायला  ठेवलेले दिसतात. पापड योग्य पद्धतीनं बनले तर ते वर्षभर व्यवस्थित टिकतात आणि जेवताना तोंडी लावणीसाठी खाता येतात. (Cooking Tips & Hacks)   बटाटा पापड, साबुदाणा पापड, कैरीचे पापड तुम्ही आतापर्यंत ट्राय केले असतील.

बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या टोमॅटोचा वापर करूनही तुम्ही वर्षभर टिकतील असे कुरकुरीत पापड करू शकता. पळी पापड तळल्यानंतर कमालीचे फुलतात आणि खायला खमंग, कुरकुरीत लागतात. टोमॅटोपासून पापड करण्याची सोपी कृती या व्हिडिओमध्ये पाहूया (How to make tomato papad)

टोमॅटो पापड करण्याची कृती

१) हे पापड करण्यासाठी सगळ्यात आधी ४ टोमॅटो कापून मिक्सरमध्ये वाटून घ्या.

२) वाटलेलं मिश्रण गाळणीनं गाळून घ्या

३) मिक्सरमध्ये साबुदाणे बारीक करून घ्या. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात साबुदाण्यांची पावडर, लाल तिखट, टोमॅटोची पेस्ट घाला. 

४) हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर जीरं, कोथिंबीर, मीठ  घाला. चांगलं ढवळून गॅस बंद करा

५) एका स्वच्छ प्लास्टीकच्या शीटला तेल लावून त्यावर मध्यम आकाराचे पापड घालून उन्हात सुकवायला ठेवा

६) २ दिवस हे पापड ४ ते ५ तासांसाठी उन्हात सुकवून घ्या. कुरकुरीत टोमॅटो पापड तळून खायला तयार आहेत.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स