मेथी आहारात हवीच. मेथीमध्ये लोह (आयर्न) चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते आणि थकवा, अशक्तपणा जाणवणे कमी होते. विशेषतः महिलांसाठी आणि वाढत्या वयातील मुलांसाठी मेथी उपयुक्त ठरते. मेथीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत होते. नियमित मेथीचा समावेश केल्यास सांधेदुखी आणि हाडांच्या कमकुवतपणावरही चांगला परिणाम दिसून येतो.
मेथीची भाजी विविध प्रकारे आहारात घेता येते. जसे की पराठे, भाजी आदी. मात्र कधी मेथीचा भात खाल्ला आहे का? मेथी राईस फार चविष्ट असतो. तसेच अगदी पौष्टिकही असतो. करायला अगदी कमी वेळ लागतो आणि जिन्नसही कमी लागते. एकदा असा पदार्थ नक्की करुन पाहा. फोडणीचा भात खातच असाल तर एकदा या पद्धतीने मेथीची फोडणी करुन पाहा.
साहित्य
मेथी, मोहरी, जिरे, तेल, सुकी लाल मिरची, कोथिंबीर, तांदूळ, शेंगदाणे, हिंग, हळद, लाल तिखट, लसूण
कृती
१. मेथी छान ताजी घ्यायची. स्वच्छ करायची आणि चिरुन घ्यायची. सुक्या लाल मिरचीचे तुकडे घ्यायचे. तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि शिजत लावायचे. भात छान मोकळा शिजवायचा आणि परातीत पसरवून ठेवायचा.
२. कढईत तेल घ्यायचे. त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यात जिरे घालायचे. नंतर त्यात शेंगदाणे घालायचे. छान परतून घ्यायचे. त्यात थोडे हिंग घालायचे. सुकी लाल मिरची घालायची. परतून घ्यायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. (Tired of eating methi in same way? Now try methi rice, a delicious dish that can be made in a few minutes.)लसूण ठेवायची. ठेचलेली लसूण फोडणीत घालायची. परतून घ्यायची. हळद घालायची आणि मीठ घालायची. ढवळून परतून घ्यायचे.
३. फोडणी छान परतून झाल्यावर त्यात मेथी घालायची. मेथी परतून घ्यायची. नंतर त्यात शिजलेला भात घालायचा. ढवळून घ्यायचे. फोडणी आणि भात एकजीव करायचे. लाल तिखटही घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे आणि गरमागरम हा भात खायचा.
