Lokmat Sakhi >Food > घट्ट कवडी दही लावण्यासाठी मिरचीची एक ट्रिक, अधमुरं दही होईल मस्त! विरजणाचीही गरज नाही...

घट्ट कवडी दही लावण्यासाठी मिरचीची एक ट्रिक, अधमुरं दही होईल मस्त! विरजणाचीही गरज नाही...

Tips & Tricks How To Make Thick Curd At Home With Green Chilli : how to make thick curd at home : green chilli trick for curd : homemade curd making hacks : natural way to set curd : दही पातळ लागतं, पाणचट होत विरजण नाही मग करुन पाहा हिरव्या मिरचीचा देसी जुगाड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2025 16:57 IST2025-08-16T16:32:06+5:302025-08-16T16:57:43+5:30

Tips & Tricks How To Make Thick Curd At Home With Green Chilli : how to make thick curd at home : green chilli trick for curd : homemade curd making hacks : natural way to set curd : दही पातळ लागतं, पाणचट होत विरजण नाही मग करुन पाहा हिरव्या मिरचीचा देसी जुगाड...

Tips & Tricks How To Make Thick Curd At Home With Green Chilli how to make thick curd at home green chilli trick for curd homemade curd making hacks natural way to set curd | घट्ट कवडी दही लावण्यासाठी मिरचीची एक ट्रिक, अधमुरं दही होईल मस्त! विरजणाचीही गरज नाही...

घट्ट कवडी दही लावण्यासाठी मिरचीची एक ट्रिक, अधमुरं दही होईल मस्त! विरजणाचीही गरज नाही...

आपल्यापैकी बरेचजण अगदी रोजच्या जेवणात दही आवर्जून खातातच. बरेचदा आपण दही बाजारांतून विकत आणतो, परंतु आजही कित्येक घरांमध्ये दही अगदी पारंपरिक (green chilli trick for curd) पद्धतीने विरजण लावूनच तयार केले जाते. दही जर घट्ट, दाटसर आणि जाड काप पडतील असे असेल तरच खायला अधिक चविष्ट लागते. आपण अनेकदा दही घरच्याघरीच (how to make thick curd at home) करतो, परंतु ते विकतसारखे घट्ट, दाटसर होत नाही. कित्येकदा दही पातळ, पाणचट आणि बेचव होते यामुळे अनेकजणी चक्क घरच्याघरीच दही तयार करणे सोडून सरळ विकतचे दही घेऊन येतात(Tips & Tricks How To Make Thick Curd At Home With Green Chilli).

दही लावण्यासाठी विरजण आवश्यक असते, हे आपण नेहमीच ऐकले आहे. पण काहीवेळा घरात विरजण नसते, मग अशावेळी काय करायचे? विरजणाशिवाय दही कसे लावायचे असा प्रश्न अनेकींना पडतो, पण एक खास साधीसोपी घरगुती ट्रिक वापरुन विरजणाशिवाय देखील तितकेच घट्ट, दाटसर आणि चविष्ट दही घरच्याघरीच लावू शकतो. विरजणाशिवाय (homemade curd making hacks) घट्ट, दाटसर दही लावणे शक्य आहे ते ही मिरचीची खास पारंपरिक ट्रिक वापरुन... फक्त एक मिरची आणि विकतसारखे जाड, घट्ट, दाटसर उत्तम चवीचे दही घरच्याघरीच होईल तयार... विरजण न वापरता फक्त एका (natural way to set curd) मिरचीच्या मदतीने घट्ट, दाटसर, दही लावण्याची भन्नाट ट्रिक पाहा... 

दही तयार करण्यासाठी फक्त हिरवीगार मिरची पुरेशी आहे... 

दही तयार करण्यासाठी घरात विरजण नसेल तर हिरवी मिरची वापरणे एक उत्तम पर्याय आहे. ही एक जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे. हिरव्या मिरचीच्या देठावर नैसर्गिक लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया (Lactic Acid Bacteria) असतात. हे बॅक्टेरिया दुधाला आंबवून त्याचे रूपांतर दह्यात करतात. हे बॅक्टेरिया त्याच पद्धतीने काम करतात ज्याप्रमाणे विरजणामध्ये असलेले जिवाणू काम करतात. ही दही तयार करण्याची नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धत आहे. यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागत नाही. फक्त ६ ते ८ तासांत विकतसारखे घट्ट दही घरच्याघरीच तयार होते.

गणपती आगमनाला करा, काकडीचा गोड धोंडस! अस्सल कोकणी पारंपरिक पदार्थ - चव परफेक्ट आजीच्या हातची... 

या पद्धतीने दही नेमके कसे तयार करावे ?  

विरजणाशिवाय दही लावण्यासाठी आपल्याला १ लिटर फुल्ल क्रीम दूध, २ ते ३ हिरव्या मिरच्या, आणि झाकण असणार एखाद मातीचं किंवा स्टीलच भांडं इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

भुरभुर पावसात प्या स्पेशल राजवाडी गरमगरम चहा, पाहा ही खास रेसिपी... 

विरजणाशिवाय दही लावण्याची सोपी पद्धत... 

सर्वातआधी, दूध चांगले उकळून घ्या आणि नंतर थोडे कोमट होऊ द्या. दूध जास्त गरम किंवा खूप थंड नसावे, फक्त कोमट असावे. आता, हिरव्या मिरचीचे देठ न धुता थेट दुधात टाका. दूध झाकून ६ ते ८ तासांसाठी एका उबदार ठिकाणी ठेवा. ८ तासांनंतर तयार दह्यातील हिरव्या मिरच्या बाहेर काढा. आपण पाहू शकता की, दही एकदम घट्ट आणि विकत सारखे तयार झालेलं असेल. 

खीर केली, करपून गेली? घाबरु नका-घ्या ६ टिप्स, खिरीचा जळका वास होईल गायब...

दही अधिक घट्ट आणि चविष्ट करण्यासाठी टिप्स... 

१. जर हवामान थंड असेल तर, दही लावलेले भांडे एका जाडसर कापडात गुंडाळून ठेवा, जेणेकरून त्याला उष्णता मिळेल.

२. दही अधिक घट्ट आणि मलईदार करण्यासाठी फुल क्रीम दुधाचा (full cream milk) वापर करा.

३. दही एकदा तयार झाले की ते लगेच फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवा. यामुळे दही जास्त आंबट होणार नाही आणि त्याची चव चांगली राहील.

Web Title: Tips & Tricks How To Make Thick Curd At Home With Green Chilli how to make thick curd at home green chilli trick for curd homemade curd making hacks natural way to set curd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.