Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुकरमध्ये भात गचका होतो? तांदूळ शिजवताना 'हा' पदार्थ घाला, एका शिट्टीत मोकळा शिजेल भात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 15:21 IST

Tips To make Perfect Rice In Pressure Cooker : तांदूळ शिजवण्याची घाई कधीच करू नये. सगळ्यात आधी तांदूळ कमीत कमी ३ ते ४ पाण्यानं व्यवस्थित धुवावा असं केल्यानं भातातील एक्स्ट्रा स्टार्च निघून जातं.

दुपारचं जेवण असो की रात्रीचं जेवण. भात हा भारतीय आहारातील एक महत्वाचा भाग आहे. अनेकदा मेहनतीनं भात शिजवूनही चिकट होतो. भात मऊ-मोकळा शिजत नाही अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. भात मऊ शिजण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही कुकरमध्ये शिजवलेला भातही मऊ-मोकळा होईल.  (Tips To make Perfect Rice In Pressure Cooker)

भात परफेक्ट होण्यासाठी टिप्स (How To Make Perfect White Rice In Cooker)

1) स्टार्च काढणं गरजेचं

तांदूळ शिजवण्याची घाई कधीच करू नये. सगळ्यात आधी तांदूळ कमीत कमी  ३ ते ४ पाण्यानं व्यवस्थित धुवावा असं केल्यानं भातातील एक्स्ट्रा स्टार्च निघून जातं. ज्यामुळे भात शिजल्यानंतरही चिकट होत नाही. धुतल्यानंतर पाणी साफ दिसेल तेव्हा समजा की भात शिजण्यासाठी तयार आहे.

तांदूळ धुतल्यानंतर १५ ते २० मिनिटांसाठी पाण्यात भिजलेले राहू द्या. भिजवलेले तांदूळ लवकर फुलतात आणि दाणे तुटत नाहीत. शिजवताना भांड्यात योग्य प्रमाणात पाणी घाला. जेव्हा पाणी व्यवस्थित उकळेल तेव्हा त्यात अर्धा छोटा चमचा मीठ आणि एक चमचा तूप घाला. तूप घातल्यानंतर एक हलका थर तयार होतो आणि तांदूळ एकमेंकाना चिकटत नाहीत आणि चमक येते.

2) उकळत्या पाण्यात तांदूळ घाला

 तांदूळ नेहमी उकळत्या पाण्यात घालायला हवेत. एक उकळ आल्यानंतर गॅस मंद करा. उच्च आचेवर तांदूळ तुटण्याची भिती असते. मंद आचेवर ८ ते १० मिनिटं शिजवून घ्या. नंतर गॅस बंद करून ५ मिनिटांसाठी झाकून ठेवा. ही पद्धत भाताला 'स्टिम राईस'ची चव देते.

3) पाणी योग्य प्रमाणात घाला

 कुकरमध्ये मऊ-मोकळा भात शिजण्यासाठी पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या. तांदळात पाण्याचे प्रमाण योग्य असायला हवे. कुकरमध्ये भात शिजवताना जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर तांदूळ जास्त चिकट होईल. 

4) २ ते ३ थेंब लिंबाचा रस

 कुकरमध्ये मऊ, मोकळा भात करण्यासाठी लिंबाचा रस वापरू शकता. तांदूळ धुतल्यानंतर कुकरमध्ये घाला.  त्यात २ ते ३ थेंब लिंबाचा रस घाला.  असं केल्यानं एक-एक दाणा मोकळा होतो.

5) शिट्टीकडे लक्ष ठेवा

कुकरमध्ये भात शिजवताना शिट्टीकडे लक्ष देणे महत्वाचं आहे. परफेक्ट मोकळा भात शिजवण्यासाठी १ ते २ शिट्ट्या पुरेशा असतात. कुकरची पहिली शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर वाफेवर भात शिजू द्या. ज्यामुळे भात मोकळा होईल आणि मऊ शिजेल. जर तुम्ही लवकर वाफ काढली तर भात कच्चा राहू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Cook perfect, fluffy rice in a cooker with these tips.

Web Summary : Tired of sticky rice? Rinse rice thoroughly, soak, and use boiling water. Add ghee or lemon juice. Cook with correct water ratio and pressure for fluffy results.
टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स