कोणताही सण म्हटलं की पुऱ्या आवर्जून केल्या जातात. फक्त महाराष्ट्रातच नाही अनेक राज्यांत सणासुधीच्या दिवशी पुरी भाजी, खीर पुरी असे पदार्थ केले जातात. पण आजकाल लोक हेल्थ कॉन्शियस झाले आहेत. पुरी खायला आवडत असेल तरी त्या डीप फ्राईड असल्यामुळे तेलकट पुऱ्या खाणं अनेकांना नको वाटतं.कमी तेलात झटपट पुरी करण्याची ट्रिक पाहूया. (Tips to Make Many Pooris At One Time Without Knead Dough)
युट्यूबवर पुरी तळण्याची एक सोपी ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकनं कमीत कमी मेहनतीत तुम्ही जास्तीत जास्त पुऱ्या करू शकाल. तसंच पुऱ्या सॉफ्टही होतील. पुरी करण्यासाठी तुम्हाला १ कप गव्हाचं पीठ, १ चमचा रवा, २ चमचे तेल, १ कप पाणी अर्धा चमचा मीठ आणि इडली स्टिमर हे साहित्य लागेल.
सगळ्यात आधी पुऱ्यांचं पीठ मळून घ्या. पीठ व्यवस्थित मळल्यानंतरच परफेक्ट पुऱ्या होतील. सगळ्यात आधी कढईत १ कप पाणी घ्या पाणी गरम झाल्यानंतर त्यात २ चमचे तूप किंवा तेल घाला. अर्धा चमचा मीठ आणि २ चमचे रवा घाला. जेव्हा रवा उकळू लागेल तेव्हा यात गव्हाचं पीठ घाला. पीठ लगेचच पाणी शोषून घेईल आणि कोरडं दिसू लागेल त्यानंतर गॅस बंद करा. नंतर ५ मिनिटांसाठी झाकण लावून ठेवा. ५ मिनिटांनी पीठ थंड होईल. हे पीठ ताटात काढून दोन्ही हातांनी व्यवस्थित मळून घ्या.
त्यानंतर पुरीसाठी छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करून व्यवस्थित लाटून घ्या. नंतर पुऱ्या लाटून एका पेपरवर ठेवा. नंतर इडली मेकरमध्ये पाणी भरून ते गरम होण्यासाठी ठेवा. इडलीच्या साच्यात पुऱ्या ठेवा. नंतर पुरीचा स्टॅण्ड इडली मेकरमध्ये ठेवा आणि २ मिनिटं शिजू द्या. पुरी अर्धवट शिजल्यानंतर काढून घ्या.
पुऱ्या थंड झाल्यावर कोणत्याही एअरटाईट पॅकेटमध्ये बंद करून फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा घरी पाहूणे येतील किंवा तुम्ही जेवताना पुरी खाणार असाल तेव्हा फ्रिजमधून बाहेर काढून तुम्ही पुरी तळू शकता. हा पद्धतीनं पुरी केल्यास पुरी सॉफ्ट, फुगलेली बनेल. इडली स्टिमरमध्ये एकत्र ८ ते १० पुऱ्या बनवू शकता. ज्यामुळे तुमचा वेळही वाचेल.
Web Summary : Make soft, fluffy pooris quickly with this simple trick! Steam semi-cooked pooris in an idli maker, then fry them later. This method saves time and reduces oil absorption.
Web Summary : इस आसान ट्रिक से जल्दी से नरम, फूली हुई पूरियां बनाएं! इडली मेकर में आधी पकी हुई पूरियों को भाप दें, फिर बाद में तल लें। यह विधि समय बचाती है और तेल का अवशोषण कम करती है।