lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > पोळपाट- लाटणं न घेता ५ मिनिटांत करा ५० पुऱ्या, बघा झटपट पुऱ्या करण्याचा व्हायरल व्हिडिओ

पोळपाट- लाटणं न घेता ५ मिनिटांत करा ५० पुऱ्या, बघा झटपट पुऱ्या करण्याचा व्हायरल व्हिडिओ

Fastest Method Of Making Pooris: पुऱ्या लाटणं, त्या तळणं हे खूप किचकट आणि वेळखाऊ काम वाटत असेल तर हा व्हिडिओ एकदा पाहाच...(viral video of making poori)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 11:32 AM2024-03-27T11:32:43+5:302024-03-27T11:33:40+5:30

Fastest Method Of Making Pooris: पुऱ्या लाटणं, त्या तळणं हे खूप किचकट आणि वेळखाऊ काम वाटत असेल तर हा व्हिडिओ एकदा पाहाच...(viral video of making poori)

Time Saving Hack To Prepare Pooris without using belan, how to make poori quickly, fastest method of making pooris, viral video of making poori | पोळपाट- लाटणं न घेता ५ मिनिटांत करा ५० पुऱ्या, बघा झटपट पुऱ्या करण्याचा व्हायरल व्हिडिओ

पोळपाट- लाटणं न घेता ५ मिनिटांत करा ५० पुऱ्या, बघा झटपट पुऱ्या करण्याचा व्हायरल व्हिडिओ

Highlightsपुऱ्या करण्यासाठी पोळपाट आणि लाटणं आपल्याकडे असायलाच पाहिजे, असं आपल्याला वाटतं. पण गंमत म्हणजे या दोन्हीही गोष्टी न घेता या बाईंनी भराभर पुऱ्या केल्या आहेत.

पोळ्या लाटणं, पुऱ्या करणं हे अनेक जणींना खूप किचकट काम वाटतं. खरं पाहिलं तर ते काम थोडं त्या प्रकारचं आहे सुद्धा. कारण हे दोन्ही पदार्थ करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यात पुऱ्या करणं तर जरा जास्तच वेळखाऊ आहे. एकेक पुरी घेऊन लाटणे आणि मग ती तळून काढणे यात खूप वेळ जातो (how to make poori quickly). वेळ लागतो किंवा पुऱ्या लाटत बसण्याचा कंटाळा येतो, म्हणून पुऱ्या करणंच टाळत असाल तर हा एक भन्नाट व्हिडिओ पाहाच (fastest method of making pooris). त्यांच्या पद्धतीने जर पुऱ्या केल्या तर नक्कीच ५ मिनिटांत ५० पुऱ्या करून होतील. (Time Saving Hack To Prepare Pooris)

 

पुऱ्या करण्यासाठी पोळपाट आणि लाटणं आपल्याकडे असायलाच पाहिजे, असं आपल्याला वाटतं. पण गंमत म्हणजे या दोन्हीही गोष्टी न घेता या बाईंनी भराभर पुऱ्या केल्या आहेत.

गुलाबाला भरभरून फुलं येतील, फक्त ४ गोष्टी करा, कधीही बिनाफुलाचं राहणार नाही रोप

त्याचाच खूप मजेशीर व्हिडिओ itz__ruchi____123 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांतच या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले असून 'Bahubali the bigning😂😂😂' अशा मजेशीर कमेंटही काही जणांनी केल्या आहेत.

 

या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने पुऱ्या करायच्या असतील तर सगळ्यात आधी पुऱ्यांसाठी छोटे छोटे कणकेचे गोळे करून घ्या. त्यानंतर एका प्लास्टिकच्या पिशवीवर तेल लावून ते गोळे काही अंतराने ठेवा.

उन्हाळ्यात व्हायलाच पाहिजे कैरीचं आंबट- गोड पन्हं, बघा पन्हं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी

त्या गोळ्यांवर दुसरी एक प्लास्टिकची पिशवी टाका आणि त्यावर एखाद्या ताटाने किंवा पसरट वस्तूने दाब द्या. दाब दिल्यामुळे पुऱ्या पसरल्या जातील आणि त्याला आपोआप गोलाकार मिळेल. छान टम्म फुगणाऱ्या गोलाकार पुऱ्या झटपट तयार होतील. 

 

Web Title: Time Saving Hack To Prepare Pooris without using belan, how to make poori quickly, fastest method of making pooris, viral video of making poori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.