तिळाची चटणी केवळ चवीलाच उत्कृष्ट नसते तर ती आरोग्यासाठीही एक उत्तम सुपरफूड मानली जाते. तिळामध्ये प्रथिनं, निरोगी फॅट्स आणि अनेक महत्वाच्या खनिजांचा साठा असतो. तिळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात. वाढत्या वयातील मुलं आणि ऑस्टिओपोरोसिसचा त्रास असलेल्या लोकांसाठी ही चटणी अत्यंत फायदेशीर ठरते. (Sesame seed Chutney Recipe)
तिळामध्ये सेसामिन आणि सेसामोलिन नावाचे घटक असतात. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यातील मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले सुधारते. तिळात फायबरचे प्रमाण चांगले असतात. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पचनक्रिया सुरळीत राहते. तिळामध्ये व्हिटामीन ई, एंटी ऑक्सिड्ंटस भरपूर असतात. यामुळे त्वचा सतेज राहते आणि केसांची वाढ चांगली होते.
तीळ उर्जेचे उत्तम स्त्रोत आहेत. हिवाळ्यात तिळाची चटणी खाल्ल्यानं शरीरात ऊब निर्माण होते आणि थकवा दूर होतो. ज्यांना एंनिमियाचा त्रास आहे. त्यांच्यासाठी तिळाची चटणी फायदेशीर आहे. कारण यात लोहाचे प्रमाण चांगले असते.
तिळाची चटणी कशी करतात?
सगळ्यात आधी कढईत गरम करायला ठेवा. त्यात तीळ घालून मंद आचेवर हलका गुलाबी रंग येईपर्यंत आणि तडतड आवज येईपर्यंत भाजून घ्या.
त्याच कढईत किसलेले सुकं खोबरं घालून हलकं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. कढईत थोडं जीरं आणि लसूण पाकळ्या टाकून परतवून घ्या. यामुळे लसणाचा कच्चा वास जातो आणि चटणी जास्त काळ टिकते.
आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ, खोबरं, लसूण जीरं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. मिक्सर चालू बंद करत जाडसर वाटून घ्या. तीळ खूप जास्त वाटले तर त्याचे तेल निघून गोळा होऊ शकतो. म्हणून चटणी थोडी दाणेदार किंवा जाडसर ठेवावी. ही चटणी पूर्णपणे थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा. ही महिनाभर चांगली टिकते. ही चटणी तुम्ही भाकरी, पोळी वरण-भातासोबत किंवा शेंगदाणे तेलासोबत खाऊ शकता.
Web Summary : Sesame chutney is a tasty, healthy superfood rich in protein, healthy fats, calcium, and iron. It strengthens bones, lowers cholesterol, aids digestion, and boosts energy. The simple recipe involves roasting sesame seeds, coconut, garlic, and spices, then grinding them coarsely. Enjoy with roti, bhakri, or rice.
Web Summary : तिल की चटनी एक स्वादिष्ट और स्वस्थ सुपरफूड है जो प्रोटीन, स्वस्थ वसा, कैल्शियम और आयरन से भरपूर है। यह हड्डियों को मजबूत करता है, कोलेस्ट्रॉल को कम करता है, पाचन में मदद करता है और ऊर्जा को बढ़ाता है। आसान रेसिपी में तिल, नारियल, लहसुन और मसालों को भूनकर दरदरा पीस लें। रोटी, भाकरी या चावल के साथ आनंद लें।