lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > रोजच्या जेवणात १ चमचा तिळाची चटणी हवीच, तोंडाला येईल चव आणि हाडं होतील मजबूत

रोजच्या जेवणात १ चमचा तिळाची चटणी हवीच, तोंडाला येईल चव आणि हाडं होतील मजबूत

Seasame Chutney Recipe (Tilachi Chutney Kashi Kartat) : तिळाची चटणी तुम्ही आवडीनुसार झणझणीत किंवा कमी तिखट, चटपटीत करू शकता. :

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 12:00 PM2024-01-09T12:00:33+5:302024-01-09T13:40:44+5:30

Seasame Chutney Recipe (Tilachi Chutney Kashi Kartat) : तिळाची चटणी तुम्ही आवडीनुसार झणझणीत किंवा कमी तिखट, चटपटीत करू शकता. :

Til Chutney Recipe : Winter Special Seasame Seeds Chutney Powder Sesame Seeds Chutney | रोजच्या जेवणात १ चमचा तिळाची चटणी हवीच, तोंडाला येईल चव आणि हाडं होतील मजबूत

रोजच्या जेवणात १ चमचा तिळाची चटणी हवीच, तोंडाला येईल चव आणि हाडं होतील मजबूत

थंडीच्या दिवसांत (Winter Recipes)  शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी गरम पदार्थांचे सेवन केले जाते.  तीळ शरीराला गरम पडतात. हिवाळ्यात तिळापासून तयार केले जाणारे अनेक पदार्थ खाल्ले जातात. रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी तुम्ही तिळाची चटणी अगदी झटपट करू शकता. (Food and Cooking Hacks) यामुळे अन्नाची चव वाढेल आणि तुम्हाला साधं जेवणही रुचकर लागेल. (Seasame Chutney Recipe) तिळाची चटणी तुम्ही आवडीनुसार झणझणीत किंवा कमी तिखट, चटपटीत करू शकता.  यासाठी कोणतीही पूर्व तयारी करावी लागत नाही. तिळाची चटणी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Tilachi Chutney Recipe)

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार तिळात प्रोटीन्स, मिनरल्स, डायटरी फायबर्स असतात. यात २१.९ टक्के प्रोटीन आणि ६१.७ फॅट असते. यातील प्रोषक घटकांमुळे 'क्राऊन ऑफ 8 ग्रेन्स' असंही म्हणतात. एंटी ऑक्सिडेंट्सचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे आजारांपासून दूर राहता येते. रोज चमचाभर तिळ खाल्ल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. 

तिळाची चटणी  करण्यासाठी लागणारं साहित्य (How to Make Sesame Chutney)

१) पांढरे तिळ- १ कप

२) शेंगदाणे- अर्धा कप

३) लाल मिरची - १० ते १५

४) मीठ- चवीनुसार

५) लसणाच्या पाकळ्या - ४ ते ५

तिळाची चटणी करण्याची सोपी पद्धत (How to Make Til Chutney)

1) सगळ्यात आधी कढई गरम करा. मध्यम आचेवर तीळ भाजून घ्या. भाजण्याच्या क्रियेसाठी तुम्हाला  जवळपास २ मिनिटं लागू शकतात.

2) तिळ भाजून  झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या.  त्यानंतर कढईत शेंगदाणे घालून जवळपास ५ मिनिटं भाजून घ्या. जेव्हा शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील तेव्हा  शेंगदाण्यांचा रंग बदलले नंतर ते एका ताटात काढून घ्या.

सॉफ्ट-जाळीदार इडल्या करण्यासाठी खास टिप्स; तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ घाला, पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या 

3) तीळ मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घ्या. जास्त बारीक करू नका नाहीतर चटणी रवरवीत होणार नाही. नंतर मिक्सरच्या  भांड्यात शेंगदाणे, लाल मिरची आणि मीठ घालून पुन्हा जाडसर वाटून  घ्या जास्त बारीक करू नका अन्यथा  शेंगदाण्यांना तेल सुटेल. ही चटणी तुम्ही तेल किंवा साजूक तुप घालू खाऊ शकता.  

चपात्या कडक होतात-धड फुगत नाही? ५ टिप्स, चपात्या फुगतील भरपूर-होतील मऊसूत

4) तिळाची चटणी करताना तुम्ही आपल्या आवडीनुसार  भाजलेलं खोबरं, लसूणही घालू शकता. भाकरी, चपाती किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी ही चटणी उत्तम पर्याय आहे.

Web Title: Til Chutney Recipe : Winter Special Seasame Seeds Chutney Powder Sesame Seeds Chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.