Lokmat Sakhi >Food > मंत्रीसाहेब म्हणाले मी तिन्ही त्रिकाळ पराठेच खातो, आता चर्चा ‘इतके’ पराठे तब्येतीसाठी चांगले की त्रासदायक?

मंत्रीसाहेब म्हणाले मी तिन्ही त्रिकाळ पराठेच खातो, आता चर्चा ‘इतके’ पराठे तब्येतीसाठी चांगले की त्रासदायक?

दिवसातून तीन वेळा पराठा खाणं खरोखरच योग्य आहे का? आणि जर असेल तर कोणता प्रकार चांगला आहे याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 16:06 IST2025-07-12T16:02:41+5:302025-07-12T16:06:42+5:30

दिवसातून तीन वेळा पराठा खाणं खरोखरच योग्य आहे का? आणि जर असेल तर कोणता प्रकार चांगला आहे याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

This Minister Eats Parathas For Breakfast, Lunch, Dinner. Can ‘Oily’ Delicacy Reduce Life Span | मंत्रीसाहेब म्हणाले मी तिन्ही त्रिकाळ पराठेच खातो, आता चर्चा ‘इतके’ पराठे तब्येतीसाठी चांगले की त्रासदायक?

मंत्रीसाहेब म्हणाले मी तिन्ही त्रिकाळ पराठेच खातो, आता चर्चा ‘इतके’ पराठे तब्येतीसाठी चांगले की त्रासदायक?

पराठा खायला अनेकांना आवडतो. दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी एका पॉडकास्टमध्ये त्यांचं पराठ्यावरील प्रेम व्यक्त केलं. "जर मी तुम्हाला सांगितलं की - सकाळ, दुपार आणि रात्री, मी फक्त पराठे खातो तर तुम्ही हसाल. पण मला दुसरं काहीही खाण्याची इच्छा नाही. मला विश्वास आहे की, देवाने फक्त दोनच परिपूर्ण गोष्टी बनवल्या आहेत - पराठे आणि दही. घरच्या पराठ्यांची चव सर्वात बेस्ट आहे" असं मनजिंदर सिंह सिरसा यांनी म्हटलं आहे.

सिरसा यांनी सकाळ, दुपार आणि रात्री पराठा खातो असं म्हटल्यावर आता दिवसातून तीन वेळा पराठा खाणं खरोखरच योग्य आहे का? आणि जर असेल तर कोणता प्रकार चांगला आहे याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. साधा पराठ्यासाठी कमी तेल वापरलं जातं, कमी कॅलरीज असतात. सामान्यतः स्टफ पराठ्यांपेक्षा तो हलका मानला जातो. स्टफ पराठ्यांमध्ये जास्त स्टफ आणि तेल वापरलं जातं त्यामुळे त्यात जास्त कॅलरीज असतात.

साधा पराठा

- कमी कॅलरीज आणि लो फॅट्स 

- कार्बोहाइड्रेट्स आणि फायबरचा चांगला सोर्स

- पोषण वाढविण्यासाठी दही, भाज्या किंवा लोणच्यासोबत सर्वोत्तम

स्टफ पराठा

- जास्त कॅलरीज आणि जास्त फॅट्स 

- विविध प्रकारचं स्टफ असल्याने प्रोटिनचा चांगला सोर्स

- जास्त तेल असल्याने आरोग्याचं नुकसान

दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल?

पराठा जर योग्य प्रमाणात आणि इतर पौष्टिक पदार्थांसह खाल्ला तर तो हानिकारक ठरू शकत नाही. परंतु तो कसा बनवला जातो, किती प्रमाणात खाल्ला जातो आणि तो कशासोबत खाल्ला जातो हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

'या' गोष्टी ठेवा लक्षात

पीठ - मैद्यापेक्षा गहू किंवा मल्टीग्रेन पीठ हा चांगला पर्याय आहे कारण त्यात जास्त फायबर आणि पोषक घटक असतात.

तेल - कमीत कमी तेल किंवा तूप लावून पराठा शेकवा. जास्त तेल किंवा जास्त बटर वापरणं टाळा.

खाण्याचं प्रमाण - एक किंवा दोन पराठे खाणं योग्य आहे. जास्त पराठा खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

कॅलरीज - एका साध्या पराठ्यामध्ये सुमारे १५०-२०० कॅलरीज असू शकतात, तर स्टफ पराठ्यामध्ये ३००-३५० किंवा त्याहून अधिक कॅलरीज असू शकतात, जे स्टफ आणि वापरलेल्या तेलावर अवलंबून असतं.

हुशारीने खा - आहार संतुलित करण्यासाठी पराठ्यांसोबत दही, एक वाटी डाळ किंवा सॅलड खा.

शरीराचं ऐका - हळूहळू खा आणि पोट भरलं की थांबा. उगाच जास्त खाऊ नका.

Web Title: This Minister Eats Parathas For Breakfast, Lunch, Dinner. Can ‘Oily’ Delicacy Reduce Life Span

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.