भारतीय स्वयंपाकातील फोडणी किंवा तडका ही केवळ कामचलाऊ पाककृती नाही, तर एखाद्या साध्या पदार्थाला चविष्ट चव देण्याची कला आहे. अनेक वेळा भाजी, डाळ, खिचडी किंवा अगदी साधे कोणतेही पदार्थ फोडणीमुळे अप्रतिम लागतात. (This is how to make spicy tadka- whether it's a vegetable or a simple curry, it will be absolutely delicious and will be ready in no time.)म्हणूनच वरतून दिलेली फोडणी ही शेवटची मोहर असते.
फोडणी प्रामुख्याने डाळींना दिली जाते उदा. वरण, आमटी किंवा तूप-फोडणीतील साधी डाळदेखील तडका मिळताच वेगळ्याच चवीची लागते. भाज्यांमध्येही फोडणी महत्वाची असते, कोबी, भेंडी, शेवगा, दुधी, गावरान पालेभाज्या या सर्वांमध्ये फोडणी सुगंध आणि चव दोन्ही अधिक ठसठशीत करते. काही पदार्थात वरुन दिलेली तिखट-लसूण किंवा कडीपत्त्याची फोडणी तर पदार्थाला अगदी घरगुती, मस्त असा पारंपारिक स्वाद देते.
फोडणीचे सौंदर्य असे की, ती अगदी साध्या पदार्थालाही उठाव देते. उदाहरणार्थ, साधी खिचडी वरुन दिलेल्या साजूक तूप आणि जिर्याच्या फोडणीने खास होते. फोडणीचा तडतड आवाज, तिचा सुगंध आणि त्यानंतर पदार्थात दिसणारा बदल, ही सगळी प्रक्रिया जेवणाला फक्त चवदार नव्हे, तर समाधानकारक करते. म्हणूनच घराघरात विविध प्रकारच्या फोडणी केल्या जातात.
साहित्य
तेल, मोहरी, जिरे, लसूण, हिरवी मिरची, चणाडाळ, कडीपत्ता, हिंग, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची, कोथिंबीर
कृती
१. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसूण ठेचून घ्यायचा. हिरव्या मरिचीचे तुकडे करायचे. काश्मीरी लाल मिरचीचेही तुकडे करायचे. चणाडाळ भिजवायची.
२. एका फोडणी पात्रात तेल गरम करायचे. त्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यात जिरे घालायचे. जिरे छान फुलले की त्यात कडीपत्ता घालायचा. तसेच लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालायच्या. चणाडाळ घालायची.
३. हिरव्या मिरीचीचे तुकडे घालायचे. लाल मिरचीचे तुकडे घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हिंग घालायचे. हळद घालायची. सारे छान परतून घ्यायचे. फोडणी खमंग झाल्यावर गॅस बंद करायचा आणि मग चमचाभर लाल तिखट घालायचे.
