Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडा असो किंवा चपाती सगळ्यासोबत मस्त लागते ही हिरवी चटणी, नेहमीच्या चटणीला द्या चविष्ट ट्विस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2026 16:12 IST

This green chutney goes great with everything, gives a tasty twist to the usual chutney : हिरवी चटणी करण्याची सोपी रेसिपी. जरा नेहमीपेक्षा वेगळी.

चटणी हा भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग आहे. साध्या जेवणालाही चविष्ट करण्याची ताकद चटणीत असते. भारतातील प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तयार केल्या जातात कोथिंबीर, पुदिना, लसूण, खोबरे, शेंगदाणे अशा विविध चवींचा आस्वाद चटण्यांमधून मिळतो. त्यामुळेच चटणी ही जेवणाची रंगत वाढवणारी मानली जाते. (This green chutney goes great with everything, gives a tasty twist to the usual chutney.)घरोघरी वेगळ्या पद्धतीची चटणी पाहायला मिळते.

विशेषतः भजी, वडा, पकोडे यांसारख्या गरमागरम पदार्थांसोबत चटणी खाण्याची परंपरा खूप जुनी आहे. कुरकुरीत भजी किंवा मऊसर वडा आणि त्यासोबत तिखट-खमंग चटणी ही जोडी सर्वांच्या आवडीची असते. चटणीमुळे या पदार्थांची चव अधिक खुलून येते आणि खाण्याचा आनंद दुप्पट होतो. सगळ्याच पदार्थांसोबत मस्त लागते अशी हिरवी चटणी एकदा या पद्धतीने करुन पाहा. नक्कीच आवडेल. 

साहित्य कोथिंबीर, सुकी लाल मिरची, लसूण, लिंबू, टोमॅटो, मीठ, जिरे, आमचूर, पाणी

कृती१. छान ताजी कोथिंबीर निवडून घ्यायची. स्वच्छ धुवायची आणि जरा चिरायचा. सुक्या लाल मिरचीचे तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. टोमॅटोचे तुकडे करायचे, अर्धा टोमॅटो किंवा लहान एक टोमॅटो घ्या. जास्त नको. 

२. एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घ्यायची. त्यात टोमॅटोचे तुकडे घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे. छान चव यावी यासाठी थोडी आमचूर पावडर घालायची. एक सुकी लाल मिरची घालायची. जास्त घातली तर चटणी जास्त तिखट होते. आवडीनुसार प्रमाण ठरवा. त्यात चमचाभर जिरे घालायचे. लिंबाचा रस पिळायचा. लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. 

३. सगळे पदार्थ एकत्र केल्यावर त्यात अगदी थोडे पाणी घालायचे. मिक्सरमधून त्याची पेस्ट वाटून घ्यायची. सगळे पदार्थ एकजीव आणि समान वाटले गेले की थोडं आणखी पाणी घालून चटणी थोडी पातळ करुन घ्यायची. पाण्याचे प्रमाण तपासून त्यानुसार चटणी वाटायची. 

English
हिंदी सारांश
Web Title : Green chutney recipe: Elevate snacks with this flavorful twist.

Web Summary : Chutney is integral to Indian meals, enhancing flavors. This green chutney recipe, featuring coriander, chili, garlic, and tomato, offers a delicious twist. Perfect with vada or chapati, it's easy to make and elevates any dish.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स