लसूण आणि जवसाची चटणी ही आपल्या पारंपरिक आहारातील एक अत्यंत पौष्टिक आणि औषधी गुणांनी भरलेली चटणी आहे. साधी, कोरडी आणि रोजच्या जेवणात सहज घेता येणारी ही चटणी आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. (This delicious and tangy chutney is a treasure for health - make it in five minutes and get fifty benefits)विशेषतः ग्रामीण भागात आणि कष्टाचे काम करणाऱ्या लोकांच्या आहारात या चटणीचा समावेश असल्याचे आपल्याला दिसते. त्याचे कारणही तसेच खास आहे.
जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, फायबर, लिग्नॅन्स आणि अँटी ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास जवस खूप मदत करतो. रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करुन चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम जवस करतो. नियमितपणे जवसाचा समावेश आहारात केल्यास रक्तदाब नियंत्रित राहण्यासही मदत होते. तसेच पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी जवस उपयुक्त ठरतो. त्यामुळे ही चटणी आरोग्यासाठी फायद्याची ठरते. करायलाही अगदी सोपी आहे. पाहा रेसिपी.
साहित्य
कडीपत्ता, लसूण, जवस, मीठ, जिरे, चणे, लाल तिखट, तेल, हळद
कृती
१. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. जरा ठेचायच्या आणि तव्यावर भाजून घ्यायच्या. परतू नका भाजून घ्या. तेलावर परतल्यावर त्याची सुकी चटणी होत नाही. त्यामुळे सारे पदार्थ भाजून घ्या. परतू नका. लसूण छान भाजला गेला की काढून ठेवा आणि जवस परता. वाटीभर जवस घ्यायचे. छान परतायचे.
२. तसेच त्यात जिरेही परतायचे. सगळे पदार्थ गार करत ठेवायचे. गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात सगळे पदार्थ एकत्र करायचे. त्यात चमचाभर हळद घालायची. तसेच चमचाभर लाल तिखट घालायचे. भाजलेले चणे घालायचे. मीठ घालायचे आणि वाटून घ्यायचे. कडीपत्ता मस्त कुरकुरीत भाजायचा. छान अशी चटणी वाटून घ्यायची.
३. चटणी वाटून झाल्यावर तव्यावर थोडे तेल घ्यायचे आणि तेलावर तयार केलेली चटणी परतायची. छान खमंग एकजीव अशी चटणी होते. खमंग झाल्यावर गार करत ठेवायची. हाताने मोकळी करायची. नंतर गार झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवायची.
