चटणी हा भारतातील फार लोकप्रिय असा प्रकार आहे. करायला सोपा आणि चवीला फारच भारी. भात असो किंवा चपाती त्यासोबत चवीसाठी चटणी असेल तर जेवणाची रंगत वाढते. मात्र चटणी हा फक्त तोंडीलावण्याचा प्रकार नसून अनेक जण चटणीच खातात. भातावर वरण नको किंवा चपातीशी भाजी नको फक्त चटणी असली तरी बास. चटणीमध्येही प्रकार असतात काही सुक्या असतात तर काही ओल्या असतात. (This chutney will enhance the flavour of your food - Eat raw onion garlic chutney )करायला दोन्ही प्रकार सोपे आहेत. असाच एक प्रकार म्हणजे कांदा लसणाची ओली चटणी करायला सोपी आहे आणि चवीला फारच मस्त आहे. त्यामुळे एकदा नक्कीच करुन पाहा.
साहित्य लसूण, हिरवी मिरची, कांदा, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, तेल
कृती१. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. कोथिंबीरीची ताजी जुडी घेऊन यायची, निवडायची आणि स्वच्छ धुवायची. कोथिंबीर बारीक चिरायची. कांद्याचे तुकडे करायचे. लहान कांदा घेतला तर जास्त छान चव लागते. कारण लहान कांदा जास्त तिखट असतो. हिरव्या मिरचीचे लहान तुकडे करायचे.
२. मिक्सरच्या भांड्यात किंवा कुटणीत कांद्याचे तुकडे घ्यायचे. तसेच कोथिंबीर घ्यायची. हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. लसणाच्या पाकळ्या जास्त घ्या म्हणजे चव जास्त छान लागते. त्यात दोन चमचे तेल घालायचे. तसेच दोन चमचे लाल तिखट घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे. पाणी नको त्याच्याऐवजी एकत्र होण्यासाठी तेल वापरायचे कारण पाण्यामुळे चटणी जरा पातळ होते.
३. चटणी मस्त वाटायची. ठेचून करत असाल तर मस्त ठेचायची, एकजीव करायची. चटणी मस्त लागते आणि करायलाही सोपी आहे.
Web Summary : This easy-to-make raw onion and garlic chutney enhances any meal. Simply blend onion, garlic, chili, coriander, spices, and oil. It's a flavorful and versatile accompaniment to rice or roti. Perfect for those who prefer chutney over traditional sides.
Web Summary : यह आसानी से बनने वाली कच्ची प्याज और लहसुन की चटनी भोजन को स्वादिष्ट बनाती है। प्याज, लहसुन, मिर्च, धनिया, मसाले और तेल मिलाएं। यह चावल या रोटी के साथ एक स्वादिष्ट संगत है। उन लोगों के लिए बिल्कुल सही है जो पारंपरिक साइड डिश की तुलना में चटनी पसंद करते हैं।