Join us

बीट म्हणजे वरदान असे सांगणारे रील पाहून बीट खाताय, पण ‘या’ लोकांनी बिटाचे ज्यूस पिणे फार घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:45 IST

Who should not drink Beetroot Juice : इतके फायदे असूनही काही लोकांसाठी बीट खाणं किंवा बिटाचा ज्यूस पिणं नुकसानकारक ठरू शकतो. अशात कोणत्या लोकांनी बीट खाऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Who should not drink Beetroot Juice : वेगवेगळी कंदमूळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. असंच एक कंदमूळ म्हणजे बीट. भरपूर लोक जेवण करताना बीट सलाद म्हणून खातात. बीट आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतं. लोक बिटापासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. रोज जर बीट खाल्लं तर शरीराला अनेक फायदे मिळतात. कारण यात व्हिटामिन्स खनिज, फायबर आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स यांच्यासोबतच फोलेट, पोटॅशिअम,  मॅगनीज, आयर्न आणि व्हिटामिन सी भरपूर असतात. ही सगळी तत्व शरीराच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. पण इतके फायदे असूनही काही लोकांसाठी बीट खाणं किंवा बिटाचा ज्यूस पिणं नुकसानकारक ठरू शकतो. अशात कोणत्या लोकांनी बीट खाऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बिटाच्या ज्यूस पिण्याचे नुकसान

ब्लड प्रेशर

अनेक रिपोर्टमधून हे समोर आलं आहे की, ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी चुकूनही बिटाच्या ज्यूस पिऊ नये. कारण हे ज्यूस प्यायल्यानं ब्लड प्रेशर लो होतं. ज्या लोकांचं ब्लड प्रेशर लो राहतं, त्यांनी या गोष्टीची खूप काळजी घ्यावी.

किडनी स्टोन

बिटामध्ये ऑक्सलेटचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. म्हणजे ज्यांना आधीच किडनी स्टोन आहे किंवा ज्यांच्या परिवारात कुणाला स्टोन झाल्याचा इतिहास असेल त्यांनी बीट खाऊ नये किंवा याचा ज्यूसही पिऊ नये. कारण किडनीमध्ये स्टोन तयार होण्याचं मुख्य कारण ऑक्सलेट हे तत्व असतं.

पोटासंबंधी समस्या

बऱ्याच लोकांना नेहमीच पोट फुगणे, गॅस किंवा जुलाबाची समस्या होत राहते. अशा लोकांनी बिटाचा ज्यूस अजिबात पिऊ नये. कारण बिटाच्या ज्यूसमुळे पोटासंबंधी समस्या अधिक वाढू शकतात.

अॅलर्जी

भलेही बिटाच्या ज्यूसचे शरीराला अनेक फायदे मिळत असतील तरी सुद्धा काही लोकांना बिटाच्या ज्यूसमुळे अॅलर्जी होऊ शकते. यामुळे त्वचेवर चट्टे, खाज, श्वास घेण्यास त्रास किंवा उलटी अशा समस्या होऊ शकतात. 

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स