Join us

टू इन वन रेसिपीची चमचमीत कमाल, ‘असा’ बटाट्याचा रस्सा करा-करायला सोपा आणि झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2025 18:38 IST

The ultimate two-in-one recipe, potato gravy – easy and quick to make easy cooking recipes : बटाट्याची साधी भाजी करताच आता एकदा असा रस्सा करुन पाहा. चव तर जगात भारी. अस्सल झणझणीत रस्सा भाजी.

घरी कोणती भाजी शिल्लक नसेल तर पटकन आपण बटाट्याची भाजी करतो. मात्र एकदा असा बटाट्याचा रस्सा खाऊन तर पाहा पुन्हा पुन्हा कराल. (The ultimate two-in-one recipe, potato gravy – easy and quick to make easy cooking recipes )चवीला अगदी मस्त आणि चमचमीत अशी बटाट्याची रस्सा भाजी करायला अगदीच सोपी आहे. पाहा काय करायचे.  

साहित्यतेल, मोहरी, जिरे, कडीपत्ता, आलं, लसूण, कांदा, काळा मसाला, गरम मसाला, हळद, धणे- जिरे पूड, लाल तिखट, मीठ, पाणी, कोथिंबीर, तमालपत्र, टोमॅटो 

कृती१. बटाट्याची साले सोलायची आणि काप करुन घ्यायचे. जास्त पातळ करु नका. तुकडे करायचे. टोमॅटो छान बारीक चिरायचा. व्यवस्थित बारीक करा. जाड फोडी नकोत. कांदा सोला आणि कांदाही छान बारीक चिरुन घ्यायचा. कोथिंबीरही मस्त बारीक चिरायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या नंतर लसूण बारीक चिरायची किंवा कुटून घ्यायची. आले किसून घ्यायचे. 

२. एका कढईत तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात तमालपत्राचे पान घालायचे. नंतर थोडी मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात चमचाभर जिरे घालायचे. जिरे छान फुलू द्यायचे. मग त्यात कडीपत्याची पाने घालायची. चिरलेली लसूण घालायची. सगळे पदार्थ छान परतायचे. किसलेले आले घालायचे. सगळे मसाले खमंग परतून घ्यायचे. 

३. त्यात कांदा घालायचा आणि गुलाबी होईपर्यंत परतायचा. कांदा परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो परतायचा. मस्त परतून झाल्यावर त्यात चमचाभर हळद घालायची. तसेच चमचाभर धणे जिरे पूड घालायची. तसेच लाल तिखट घालायचे. काळा मसाला घालायचा आणि चवी पुरते मीठही घालायचे. सगळे मसाले जरा परतल्यावर त्यात बटाट्याचे तुकडे घालायचे. जरा दोन मिनिटे परतायचे आणि मग त्यात चांगले दोन वाटी पाणी घालायचे. 

४. भाजी उकळली की बटाटा शिजलाय की नाही ते तपासा. भाजी जास्त घट्ट असेल बटाटाही कच्चा असेल तर त्यात आणखी पाणी घाला आणि झाकून ठेवा. भाजी उकळून घ्यायची. मग त्यातील बटाटा चमच्यानेच जरा कुसकरायचा. बटाटा व्यवस्थित मऊ होऊ द्यायचा. रस्साही जरा छान घट्ट झाल्यावर गॅस बंद करायचा.       

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स