Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कुकरमध्ये वरण-भात शिजवताना डाळ कच्ची राहते? ‘असा’ लावा कुकर, दोन्ही शिजेल छान मऊ

कुकरमध्ये वरण-भात शिजवताना डाळ कच्ची राहते? ‘असा’ लावा कुकर, दोन्ही शिजेल छान मऊ

How to Cook Dal and Rice Together in a Pressure Cooker : डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी तसंच डाळ आणि तांदूळ मऊ होण्यासाठी काही टिप्स पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 23:33 IST2025-11-03T23:25:18+5:302025-11-03T23:33:07+5:30

How to Cook Dal and Rice Together in a Pressure Cooker : डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी तसंच डाळ आणि तांदूळ मऊ होण्यासाठी काही टिप्स पाहूया.

The Smart Way to Cook Dal and Rice Simultaneously in a Pressure Cooker | कुकरमध्ये वरण-भात शिजवताना डाळ कच्ची राहते? ‘असा’ लावा कुकर, दोन्ही शिजेल छान मऊ

कुकरमध्ये वरण-भात शिजवताना डाळ कच्ची राहते? ‘असा’ लावा कुकर, दोन्ही शिजेल छान मऊ

वेळेची बचत करण्यासाठी आणि रोजचा स्वंयपाक झटपट होण्यासाठी डाळ आणि भात प्रेशर कुकरमध्ये एकत्र शिजवणं हा सोपा आणि उत्तम पर्याय आहे. या पद्धतीला इंग्रजीमध्ये पॉट इन पॉट पद्धत असंही म्हणतात. वरण भात करताना अनेकदा आपण कुकरचा वापर करतो (How to Cook Dal and Rice Together). पण भात शिजतो आणि डाळ कच्ची राहते असं बऱ्याचदा होतं. डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी तसंच डाळ आणि तांदूळ मऊ होण्यासाठी काही टिप्स पाहूया. (The Smart Way to Cook Dal and Rice Simultaneously in a Pressure Cooker)

१) तुरीची डाळ वापरत असाल तर ती किमान ३० मिनिटं भिजवून टेवा. यामुळे डाळ लवकर शिजते. मूग डाळ किंवा मसूर डाळ भिजवण्याची गरज नाही. एका लहान स्टीलच्या भांड्यात डाळ घ्या. त्यात डाळीच्या दुप्पट पाणी घाला. हळद आणि चिमूटभर हिंग घाला.

२) दुसऱ्या लहान स्टिलच्या भांड्यात तांदूळ घ्या. तांदूळ स्वच्छ करून घ्या. भातासाठी पाण्याचे प्रमाण तांदळाच्या प्रकारानुसार बदलतं. मोकळा भात हवा असल्यास पाण्याचे प्रमाण थोडं कमी ठेवा.

३) प्रेशर कुकरच्या तळात १ ते दीड इंच उंचीपर्यंत पाणी घाला. या पाण्यावर कुकरमध्ये असलेला स्टँण्ड किंवा एक छोटी जाळीची प्लेट ठेवा. हा स्टॅण्ड दोन्ही भांडी पाण्यापासून वर ठेवतो.

३) सर्वात आधी डाळीचे भांडे स्टँडवर ठेवा. डाळीला जास्त उष्णता लागते म्हणून ती खाली ठेवतात. डाळीच्या भांड्यांवर एक छोटी रिंग ठेवून त्यावर भाताचे भांडे ठेवा. भात लवकर शिजतो म्हणून वर ठेवा.

४) डाळ आणि भाताच्या दोन्ही भांड्यांमध्ये एक एक थेंब तेल किंवा तूप घातल्यास पदार्थ कुकरमधून बाहेर येत नाही आणि भात मोकळा शिजतो. कुकरचे झाकण व्यवस्थित बंद करा आणि शिटी लावा. गॅस मोठा ठेवून पहिली शिट्टी होऊ द्या. पहिली शिट्टी झाल्यावर गॅस मध्यम करा आणि ३ ते ४ शिट्या होऊ द्या. शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा.

५) गॅस बंद केल्यावर कुकरमधील दाब आपोआप पूर्णपणे कमी होण्याची वाट पाहा. घाईत कुकर उघडू नका. दाब कमी झाल्यावर हळूवारपणे झाकण उघडा आणि डाळ-भाताची भांडी बाहेर काढा. अशाप्रकारे डाळ आणि भात एकाचवेळी परफेक्ट शिजून तयार होतात. डाळीला गरमागरम फोडणी देऊन तुम्ही हे वरण सर्व्ह करू शकता.

Web Title : कुकर में दाल-चावल पकाने का सही तरीका, नरम और फूला हुआ।

Web Summary : पॉट-इन-पॉट विधि से कुकर में दाल और चावल एक साथ पकाएं। पहले दाल को भिगो दें। दाल को कुकर के नीचे और चावल को ऊपर रखें। उफनने से रोकने के लिए तेल डालें। सही परिणाम के लिए दबाव स्वाभाविक रूप से निकलने तक पकाएं।

Web Title : Cook dal and rice perfectly in a cooker, soft and fluffy.

Web Summary : Cook dal and rice together in a cooker using the pot-in-pot method. Soak dal beforehand. Place dal at the bottom of the cooker and rice on top. Add oil to prevent overflow. Cook until pressure releases naturally for perfect results.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.