चटणी हा पदार्थ भारतात फार आवडीने खाल्ला जातो. अनेक प्रकारच्या चटणी केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे खजूर चटणी. हा पदार्थ भारतीय स्वयंपाकघरातील एक खास आणि लोकप्रिय घटक आहे. (The perfect recipe for sweet and sour date chutney, once you eat it, must try recipe )गोड, थोडीशी आंबट आणि मसाल्यांचा समतोल स्वाद असल्यामुळे ही चटणी चवीला खूपच मस्त लागते. चाट, समोसा, कचोरी, ढोकळा, पकोडे किंवा साध्या भाजीसोबतही खजूर चटणी खाल्ली तर पदार्थाची चव लगेचच खुलते. म्हणूनच अनेक घरांमध्ये ही चटणी आवर्जून करुन ठेवली जाते.
खजूर चटणीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती टिकाऊ असते. एकदा नीट तयार करुन ठेवली तर ही चटणी साधारणपणे पंधरा दिवस सहज टिकू शकते. योग्य साठवणूक केली तर तिची चव आणि दर्जा बराच काळ चांगलाच राहतो.फ्रिजमध्ये ठेवली तर ही चटणी अजूनही जास्त काळ चांगली राहते.
साहित्य खजूर, चिंच, पाणी, मीठ, गूळ, लाल तिखट, सुंठ, चाट मसाला
कृती१. खजुराच्या बिया काढून घ्यायच्या. तसेच चिंचेच्या बिया काढून घ्यायच्या. एका भांड्यात खजुर आणि चिंच गरम पाण्यात भिजत ठेवायची. पंधरा ते वीस मिनिटे भिजवायची. गूळ मस्त बारीक चिरुन घ्यायचा. २० मिनिटांनंतर एका मिक्सरच्या भांड्यात खजुर आणि चिंच घ्यायची. त्याची पेस्ट वाटून घ्यायची. पाणी जास्त नको योग्य प्रमाणात ठेवायचे.
२. पेस्ट एकदम मस्त वाटून घ्यायची. त्यात काहीच अख्खे राहणार नाही याची काळजी घ्यायची. नंतर एका गाळणीच्या मदतीने पेस्ट गाळायची. त्यातील चोथा काढून टाकायचा. गाळल्या शिवाय चटणी करु नका कारण चिंचेच्या काड्या दातात अडकतात. त्यामुळे त्या काढणे गरजेचे असते.
३. वाटून झालेली पेस्ट एका पातेल्यात घ्यायची. त्यात चमचाभर लाल तिखट घालायचे. तसेच थोडे मीठ घालायचे. चमचाभर सुंठ घालायची. थोडा चाट मसाला घालायचा. किसलेला गूळ घालायचा. अगदी थोडे पाणी घालायचे. मिश्रण ढवळायचे आणि गॅसवर मंद आचेवर उकळू द्यायचे. पाच ते दहा मिनिटे ढवळत राहायचे. मस्त घट्ट अशी चटणी तयार होते.
Web Summary : Date chutney, a sweet, sour, and spicy Indian condiment, enhances various dishes like samosas and pakoras. Easy to prepare and store, it lasts for about two weeks, offering a flavorful accompaniment to meals.
Web Summary : खजूर की चटनी, एक मीठा, खट्टा और मसालेदार भारतीय व्यंजन है, जो समोसे और पकोड़े जैसे विभिन्न व्यंजनों को बढ़ाता है। बनाने और स्टोर करने में आसान, यह लगभग दो सप्ताह तक चलती है, जो भोजन के लिए एक स्वादिष्ट संगत प्रदान करती है।